अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धर्मापुरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणराज्य दिनाच्या शुभ-पर्वावर 26 जानेवारी रविवारला तीन दिवसीय मंडई ची सुरुवात हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर दुपारी एक वाजता आम दंगलीने झाले.
रात्री साडेआठ वाजता वार्ड क्रमांक दोन येथे जय बजरंग नाटक मंडळ च्या सौजन्याने नऊ अंकी नाटक देवासुर संग्राम गुरु का अपमान उर्फ वज्र की निर्मिती व्रतासूर वध, वार्ड क्रमांक तीन येथे खेम भारती नाटक मंडळ च्या सौजन्याने नव अंकी नाटक खून का झुटा इल्जाम उर्फ शेर सिंह डाकू संग्राम, नऊ अंकी नाटका दरम्यान प्रत्येक अंकानंतर रिकॉर्डिंग डान्स दाखविण्यात आले.
आज 27 जानेवारी सोमवारला सकाळी नऊ वाजता वार्ड क्रमांक दोन मध्ये जय बजरंग नाटक मंडळ च्या सौजन्याने डांसर बंटी बबली, छोटू मास्तर यांच्या संपूर्ण पार्टी सहित शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या राष्ट्रीय संगीत खडा तमाशा, वार्ड क्रमांक तीन येथे खेम भारती नाटक मंडळ च्या सौजन्याने शाहीर नागोराव हिवरा यांच्या संपूर्ण पार्टी सहित राष्ट्रीय गोंधळ सुरू असून मंडई निमित्त गावाला जत्रेचे स्वरूप आलेले आहेत,रात्री आठ वाजता वार्ड क्रमांक तीन मध्ये व्यापारी मित्र मंडळ तर्फे मेन रोड बस स्टॉप वर एकता नाट्य कला मंच वडसा निर्मित संगीत नाटक थैमान, स्मार्ट सिटी धर्मापुरी येथे वार्ड क्रमांक दोन मध्ये यादगार लावणी डान्स ग्रुप गोंदियाच्या लावणीच्या कार्यक्रम, वार्ड क्रमांक तीन मध्ये मेंडा टोला धर्मापुरी शिवाजी मित्र मंडळ तर्फे सैराट लावणी ग्रुप वडसा लावणीच्या कार्यक्रम सुरू होणार आहे, 28 जानेवारी मंगळवार ला रात्री आठ वाजता बाल गणेश मंडळ तर्फे बाजार चौक येथे नवरंग लावणी डान्स ग्रुप नागपूरच्या लावणीच्या कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात ,प्रमुख अतिथी माजी आमदार टेकचंद सावरकर, आमदार कृपाल तुमाने, माजी सभापती स्वप्नील श्रावणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल, माजी कृषी सभापती तापेश्वर वैद्य, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजेश ठवकर ,माजी सभापती राजकुमार ठवकर ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश तलमले , मोरगाव सरपंच नंदलाल पाटील, माजी उपसभापती रक्षा श्रीहरी थोटे, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल ,भाजपा मौदा तालुकध्यक्ष चांगो तिजारे, माजी उपसभापती अशोक हटवार, ठाणेदार स्नेहल राऊत ,खरडा सरपंच वैशाली मुरलीधर तांबुलकर ,खात सरपंच माधुरी कैलास वैद्य , माझी पंचायत समिती सदस्य शंकर भिवगडे ,माजी सरपंच तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवदास मदनकर , माजी सरपंच विकास मदनकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भोजराज भिवगडे, भाजपा बुथ प्रमुख दिनेश श्रावणकर सह गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
तरी या जत्रेच्या स्वरूप आलेल्या मंडळी उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान धर्मापुरी येथील हनुमान मंदिराचे देवस्थान पंचकमिटी, सरपंचा सविता गणराज भिवगडे, उपसरपंच वंदना काशिनाथ बावनकुळे, सदस्यगण रेखा रामप्रसाद ठाकरे , संगीता संजय क्षीरसागर, रेशमा दिलीप श्रावणकर, शैलेंद्र (बाबा) थोटे, मनोज आंबीलढूके , नथ्थू येवले , प्रदीप बर्वे, सचिव मनोज मंडावी,पोलीस पाटील भाग्यश्री वाघ , तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आंबीलढूके सह समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.