– ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. काल मतदान झालं. परवा मतमोजणी होणार आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी…..
मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. काल मतदान पार पडलं आहे. शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठरवू नये. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झाले हा तपासाचा भाग आहे. प्रचंड पैसे त्यांनी वाटले आहेत. तरी सुध्दा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अभिमानावर लढलेली आहे. पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता लोकांनी मतदान केलं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आजच गौतम अदानींवर वॉरंट निघालं आहे. महाराष्ट्र अदाणीला विकायला निघालेला आहे. ट्रंप सरकारने अदाणी विरोधात वॉरंट काढल आहे. धारावी, एअरपोर्ट अनेक टेंडर आहेत. त्यातही गौतम अदाणीने, संगनमत करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुध्दा ट्रंप प्रशासनाप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न झाला, असं संजय राऊत म्हणालेत.
महाविकास आघाडीला लोक कौल देणार आहेत. त्यातून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. नाना पटोले मुख्यमंत्री बनणार असतील. तर राहुल गांधींनी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींनी घोषणा केली पाहिजे. अदानीमुळे देशाला डाग लागला आहे. महाराष्ट्रात जी लढाई झाली ती अदानी राष्ट्र बनू नये म्हणून ही लढाई सुरु आहे. निवडणूकीत 2000 हजार कोटींपेक्षा जास्त अदानींनी आले आहेत. ट्रंप सरकारने गौतम अदानी विरोधात अश्यामुळेच अरेस्ट वॉरंट काढले आहेत. आम्ही 100 पेक्षा जास्त अरेस्ट वॉरंट काढू, असं संजय राऊत म्हणालेत.