नागपूर :- जी-20 अंतर्गत C- (20) आंतरराष्ट्रीय परिषद ही नागपूर शहरात 20 व 21 मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे. जी-20 परिषदेला देश विदेशातील अनेक मान्यवर, महत्वाचे व्यक्ती नागपूर शहरात होणा-या विविध कार्यकमांकरिता शहराच्या विविध भागात कार्यक्रमांकरिता उपस्थित राहणार आहे. जी-20 अंतर्गत C- (20) परिषदेला देशविदेशातील अनेक मान्यवर, महत्वाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या जिवीतास विविध स्तरातून, विविध माध्यमाने धोके संभवतात. जी-20 अंतर्गत C- (20) परिषदकरिता उपस्थित राहणाऱ्या देश विदेशातील मान्यवरांना मानवी दहशतवादी संघटनांकडून तसेच Non-Conventional Aerial Objects, Drones, Remote Controlled or Remotely Piloted Aircrafts, Aircraft systems, Para-gliders, Aero-models, Parachute कडुन असलेले सुरक्षर्कच्या दृष्टीने धोके लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात येत आहे, असे सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजी यांनी कळविले आहे.
@ फाईल फोटो