शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने कन्हान व रामटेक येथे मोर्चा काढून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा तीव्र निषेध

रामटेक :- शिवसेना आमदार अपात्रेच्या निकालावर काल सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतिशय पक्षपाती निर्णय दिला. मा. सर्वोच्च न्यायालय यांनी अतिशय स्पष्ठ शब्दात कायद्याच्या चोकटीत राहून विधानसभा अध्यक्षांना अपात्र आमदार प्रकरणातील ‘न्यायवादी’ निर्णय घेण्यास सांगितले गेले.परंतु नार्वेकरांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही सूचनेचे पालन न करता सूडबुद्धीने व संकुचित बुद्धीने निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्रालाच नव्हे तर लोकशाहीला सुद्धा घातक असा निर्यय आहे. या नार्वेकरांच्या निर्णयामुळे लोकशाही व संविधानाची हत्या झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

त्यावर रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हान व रामटेक शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चा काढत नारे-निर्दशने करून नार्वेकरांचा जाहीर तीव्र निषेध करण्यात आला.

या निषेध सभे दरम्यान शिवसेनेचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांनी म्हटले कि, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना न्यायालयांनी ‘निपक्ष न्याय’ देण्यास सांगितले होते. परंतु सर्वाच्च न्यायालयाच्या कायद्याची चौकट आखून दिलेल्या सूचनेचे पालन केल्या गेले नाही. या निकालामुळे महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट तयार झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कि, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. संपूर्ण महाराष्ट्र ही भावना व्यक्त करीत आहे.

आमची बाजू न्याय व सत्याची असून पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब सर्वोच्च न्यायालयात या बाबत नव्याने दाद मागतील.अशी खुप संकटे शिवसेनेने बघितलेले आहे. याही संकटातून तावून-सुलाखून निघू अशी भावना व्यक्त करीत दिल्या गेलेल्या या निर्णयाचा शिवसेना (उ.बा.ठा.) रामटेक विधानसभा क्षेत्राच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.

या निषेध मोर्चा मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले,पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे,उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर,विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुत्तम मस्के, रामटेक विधानसभा सल्लागार प्रमुख अरुण बनसोड,रामटेक विधानसभा संघटक रमेश तांदुळकर, संघटिका दुर्गा कोचे,रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखान्द्रे, पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार युवासेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर,मौदा तालुका प्रमुख नरेश भोंदे, कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावणे,रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर,उपशहर प्रमुख राहुल टोंगसे,उपतालुका प्रमुख सुनील सहारे,उपतालुका प्रमुख मोहन कोलवते,विभाग प्रमुख इंद्रपाल बोरकर,पिंटू खंडार, विभाग प्रमुख राहुल वानखेडे,युवासेनेचे राहुल ढोबळे,विभाग प्रमुख प्रशांत लकडकर, कांद्री शहर प्रमुख सुरेश आंबिलडुके,श्याम मस्के,उपविभाग प्रमुख,दयाशंकर नागपुरे, विजय सोयाम, वनिता मेश्राम, प्रमिला शेंडे सह लोकसभा,विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर महानगरपालिका, नागपूर (प्रवर्तन विभाग) अनधिकृत बांधकामावर कारवाई

Fri Jan 12 , 2024
नागपूर :- म.न.पा. प्रवर्तन विभाग मार्फत दिनांक ११.०१. २०२४ रोजी मंगळवारी झोन क्र.१० अंतर्गत प्रमोद सोनटक्के प्लॉट क्र B/279 मार्टिन नगर रिंग रोड जरीपटका नागपूर येथील अनधिकृत बांधकामाची कारवाई करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अंतर्गत दिनांक 22.8.2023 रोजी झोन द्वारा नोटीस तामील करण्यात आली होती. तर आज अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!