नागपूर :- शहर पोलीस दलाच्या वतीने नागपूर शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पोलीस आयुक्त ,नागपूर शहर डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात पोलीस विभागाचे जुने साहित्य जतन संग्रहालय निर्माण करण्याचे नियोजित आहे. याकरिता शहरातील पोलीस विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमलदार,सर्व सामान्य नागरिक ज्यांचे नातेवाईक, मित्र परिचित जे पोलीस विभागाशी संबंधित आहे अथवा नाही परंतु त्यांच्याकडे पोलीस विभागाशी संबंधित जुनी संग्रहित वस्तू जतन करून ठेवली आहे अशी व्यक्ती तसेच अशी ही व्यक्ती ज्यांनी पोलीस खात्यात त्यांच्या कारकिर्दीमध्ये मौलिक कामगिरी बजावली असेल व याबाबत त्यांच्याकडे पोलीस खात्याची जुने दुर्मिळ साहित्य आहे असे सर्व व्यक्ती तसेच ज्यांच्याकडे संग्रहित जतन करून ठेवलेली पोलीस खात्याशी संबंधित गणवेश, लाठी, शूज, कॅप, बेल्ट, गणवेशाचे आर्टिकल , कारकिर्दीत मिळालेले मेडल्स, सन्मानचिन्हे, सोर्ड, बेल्ट, पीटी ड्रेस, जुने ओळखपत्र, किटपेटी, सतरंजी, सरंजाम, हेल्मेट, प्रमाणपत्र, छायाचित्र, पुस्तक, सेवा पुस्तक, रायफल सिलिंग, कट शूज , डीएमएस शूज इत्यादी अथवा याव्यतिरिक्त इतर कुठलेही साहित्य जे आपणाकडे उपलब्ध आहे आपण पोलीस आयुक्त कार्यालय सिव्हिल लाईन येथे भेट द्यावी अथवा पोलीस आयुक्त यांचा मोबाईल क्र. 7385982212 यावर संपर्क साधावा किंवा व्हाट्सअपवर संदेश पाठवावा. आपल्याकडून प्राप्त प्रत्येक साहित्याची दखल स्वतः पोलीस आयुक्त घेणार असून याबाबतचा एक संग्रहालय तयार करणे आणि या सर्व पुरातन वस्तू जतन करून ठेवणे व येणाऱ्या पिढीला सदर साहित्य याबाबत प्रदर्शित करणे असे नियोजित आहे. तरी आपणा सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नागपूर शहर पोलिसांच्या या उपक्रमाकरिता सहकार्य करावे.
“नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या वतीने नागपूर शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन “
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com