नागपूर – आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी नागपूरात आलेल्या प्रवाशांच्या आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंग साठी पुणे एन आई वी मध्ये पाठविण्यात आला होता. त्या अहवालातील एका रुग्णाला ओमायक्रॉन असल्याचे आढळून आले.
आयुक्तांनी सांगितले की, या रुग्णांवर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच ४० वर्षीय ओमायक्रॉन बधितामध्ये कोणतेही लक्षण नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची सुद्धा तपासणी करण्यात आली.
घाबरू नका, काळजी घ्या. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सर्व कोव्हिड नियमांचे पालन करावे, मास्क, शारीरिक अंतर आणि हात वेळोवेळी सॅनिटायजर करीत राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व नागपूरकरांना केले आहे.
तसेच ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आहे अशांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. सोबतच अजूनही लस न घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी पुढे यावे. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे आणि ८४ दिवस झाले आहे त्यांनी लवकर दूसरा डोज घ्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.