गुप्ता कोल वास वासरी च्या धुळामुळे शेतपिकाचे व ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात

-शेतक-यांची नुकसान भरपाई देऊन, कोल वासरी दुसरी कडे स्थातंरीत करण्याची मागणी. 
कन्हान : – गट ग्राम पंचायत घाटरोहणा (येसंबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवारा लगत येसंबा  गावा जवळ गुप्ता कोल वासरी महा मिनरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच वर्षी सुरु झाली असुन ही कंपनी गावापासुन ५०० मीटर अंतरावर असुन कंपनीत पोक लँड व जेसीबी मशीनने उघडयावर कोळशा बारीक करून रासायनिक प्रकिया होत असल्याने कोळश्याची धुळ दुरवर गावात, शेतीत, शेतपिकावर उडत असल्या ने शेतपिकाचे, नागरिकांचे तसेच जनावरांच्या आरोग्या स धोका निर्माण होत आहे. तसेच कंपनीतील कोळसा च्या धुळीमुळे विहीर, नाल्याचे पाणी मोठया प्रमाणात दुषित होत असल्याने दुषित पाण्यामुळे सदर गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या कोळश्याच्या धुळीच्या वायु व जल प्रदुशनाने शेत पिकांचे नुकासान होऊन गामस्थाचे व शेतक-याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
         गुप्ता कोल वासरी कंपनी चालु असतांना आजु बाजुच्या लगत शेतीमध्ये मोठया प्रमाणात कोळश्याची धुळ शेतपिकावर उडुन शेत जमिनवर व शेतातील मोसंबी, कापुस, तुर, चना, मिरची, वांगे या पिकावर कोळश्याची धुळ बसुन पिके खराब झाली असुन शेता तील कापुस काढण्यास शेतमजुर येत नाही. मोसंबी, मिरचे बाजारात विकायला नेली तर कोणी घ्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील दिड-दोनसे एकर शेतीतील पिकाचे अतोनात नुकासान शेतक-यांना भोगावे लागत आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणा-या धुळी ने कपडे, शरीर काळे होत असल्याने गावात जायची सुध्दा शरम येत असते. नाले, विहीतील पाणी या धुळीने दुषित होत असल्याने नागरिक, जना वरे हेच पाणी पित असल्याने गावक-यांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास्तव शेतक-यांच्या व गावक-याच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणुन गुप्ता कोल वासरी कंपनीच्या कोळश्या धुळीमुळे शेतपिका चे झालेले नुकसान शेतक-यांना त्वरित कंपनी मालका ने दयावे. तसेच गावापासुन दुर दुसरीकडे जिथे कुणाचे नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी स्थानातरित कर ण्यात यावी.
       गावक-यांच्या तक्रारीने गट ग्रा प वराडा ने ठराव घेऊन कंपनीस ठरावाची प्रत ठेण्यात आली आहे. या कंपनीचे प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी संबधित अधिका-याना निवेदन देऊन मागणी केली आहे. मा. जिल्हाधि कारी साहेब व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधि कारी सुध्दा कुठलीच कार्यवाही व समस्येवर गांभिर्याने लक्ष दिले नसल्याने परत निवेदन देऊन गुप्ता कोल वासरी च्या कोळशा धुळ प्रदुर्शन पासुन मुक्त करण्यात यावे. अन्यथा येणा-या काही दिवसात समस्त गावकरी कंपनी विरोधात जन आंदोलन करतील त्यावेळेस उद भवणा-या प्रकारास कंपनी मालक व संबधित प्रशासन अधिकारी जवाबदार राहतील. अशी चेतावणी तेजराम खिळेकर, सुभाष शेळकी, राजु शेळकी, युवराज नाक तोडे, वासुदेव टाले , दिलीप ठाकरे, संदीप ठाकरे, हेमंत ठाकरे, धोंडबा चरडे, प्रशांत चरडे, अतुल चरडे, नरेंद्र चरडे, नारायण चरडे, धनराज राऊत, क्रिष्णाजी खिळे कार, प्रकाश देऊळकर, सुभाष देऊळकर, अभय हेटे, गणेश घोडमारे, राजेंद्र घोडमारे, अशोक वरठी, वासुदेव वरठी, सुधाकर वरठी, अजाब चिखले, सुधाकर चौधरी , प्रविण शेळकी, भुपेश गिऱ्हे, नारायण टाले, विनोद जामदार, रमेश जामदार, कवडु शेळकी, आसाराम चिखले, क्रिष्णाजी शेळकी, राजु बोबडे, लक्ष्मण काळे , प्रकाश काळे, रामराव ठाकरे, दिपक ठाकरे, भगवान मोहुर्ले, गणेश मोहुर्ले, सतिश हिवसे, देवाजी ठाकरे, अर्जुन काळे, भोला कांबळे, प्रकाश गायकवाड, राजेंद्र राऊत, ओमकार   पौर्णिमा चरडे, पल्लवी चरडे, मारोती कोटरूंघे, मनोहर बावने, लक्ष्मीबाई लसुंते, येणुबाई वाणी, शालुबाई खिळेकार, चंद्रभागाभाई खिळेकार, आम्रपाली चव्हाण सह मागणी करित शेतकरी व ग्रामस्थानी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जीएसटी रिटर्न्स की अवधि बढाई जाए--कोसिया

Sat Dec 25 , 2021
नागपुर – वित्त वर्ष 2020-21 के लिए GSTR 9 और 9C दाखिल करने की नियत तारीख 31 दिसंबर 2021 है, लेकिन चूंकि GST में कुछ महत्वपूर्ण मुद्दे हैं, जिन पर स्पष्टीकरण, संशोधन और परिपत्र जारी करने के लिए सरकार को तत्काल ध्यान देने की आवश्यकता है, जो व्यापार करने में आसानी प्रदान करेगा, बेहतर होगा। अनुपालन और मुकदमेबाजी को कम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com