भंडारा – २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा संविधान स्वीकारण्याचा दिवस, तारीख २६ नोव्हेम्बर रोजी
भारतीय संविधान लिहून पूर्ण झाले व या संविधानवर घटना समितीच्या सर्व सदस्यांनी सह्या केल्यात व हे संविधान
स्वीकारण्यात आले.
बाबासाहेब आंबेडकर या महान तत्वज्ञानी हे संविधान लिहिले, भारत देशाच्या कारभारासाठी प्रत्यक्ष
अमलबजावणीसाठी संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले.भारतीय संविधान दिन व मुंबई हल्ल्यात
शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जैताणे येथील त्रिमुर्ती चौक बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भंडारा. येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी सविधानाचे वाचन करून अभिवादन करण्यात आले,
प्रास्ताविक राजेशजी ईशापुरे यांनी मांडले, यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते श्री.
पवनजी मस्के प्रतिमेला माल्यार्पन केले मानवदंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतेवेळी, श्री. हिवराज उके,
श्री. बोरकर, सर, सौरप करंडे, नंदागवळी, अचलजी मेश्राम, शंशीकांत भोयर आदी आंबेडकर चळवळीचे लोक व
मान्य्वर लोक उपस्थीत होते.
ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य् भंडारा जिल्हा तर्फे जैताणेत संविधान दिन साजरा! आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण केले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com