नायलॉन मांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई ; एकुण 15,72,700/- मुद्देमाल जप्त

नागपुर – नागपुर शहरात नाायलॉन मांज्याचा वापर पंतग उडविण्यासाठी होत असल्याने यापुर्वी काही दुर्घटना झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागपूर शहराचे मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नायलॉन मांजा जवळ बाळगणारे/विक्री करणारे/वापर करणारे इसमांवर कारवाईकरण्याची निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे  गुन्हे  शाखेकडुन मोठ्याा प्रमाणावर याबाबतच्या कारवाई करणे सुरू आहे.  गुन्हे शाखा, युनीट क्र. 3 पथकास मिळालेल्या माहिती वरून दिनांक 07/01/2022 या एकाच दिवशी नागपुर शहरातील विवीध ठिकाणी  पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकनु 12 कारवाई करून मोठ्याा प्रमाणावर नायलॉन मांजा जप्त करण्यात आलेला आहे. या मध्ये पोलीस स्टेशन   1) कोतवाली, 2) गणेषपेठ, 3) पाचपावली, 4) सक्करदरा, 5) वाठोडा, 6) धंतोली, 7) यषोधरानगर, 8) कळमणा या पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी एक व पोलीस स्टेशन 1) तहसील व 2) नंदनवन हद्दीत प्रत्येकी दोन अश्या एकुन 12 कारवाई करण्यात आलेल्या आहेतनमुद पोलीस स्टेशन मध्ये कलम 5, 15 पर्यावरण कायदा 1986, सह कलम 188 भा.द.विअन्वये एकुन 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन, नायलॉन माझा जवळ बाळगणारे/विक्रि करणारे अष्या 12 इसमांना अटक केली आहे. सदर कारवाई मध्ये एकुन 1,768 बंडल किंमत रू 2,67,400 नायलॉन मांजा जप्त केला आहे.

नाशीक व भंडारा येथुन दोन मांजा विक्रेत्यांना घेतले ताब्यात: –

नागपुर मध्ये युनीट 3 पथकाकडुन नायलॉन मांजा संबधी होत असलेल्या कारवाई दरम्यान 1) सिन्नर, जिल्हा नाशीक व 2) अड्यााळ, पवनी, जिल्हा भंडारा येथील व येथील दोन इसमांच्या माध्यमातुन नागपुर मधील काही लोकांना नायलॉन मांजा विकला जात असल्याचे निश्पन्न झाले.
त्यावरून नमुद ठिकाणी सपोनि नेककर व पथक असे जावुन त्यांनी इसम नामे 1) आकाश पांडुरंग छलारे वय 27 वर्शे, रा. ग्रिन वडु स अपार्टमेंट, सिन्नर, ता. सिन्नर, जिल्हा नाषीक व 2) गणेश केशव धकाते वय 25 वर्शे, रा. शिवाजी चौक, अड्यााळ, पवनी, जिल्हा भंडारा या दोन इसमांना ताब्यात घेवून नागपुर येथे आणले. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांनी  नागपुर मध्ये ज्यांना नायलॉन माजा विकलेला होता त्यांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आलेली आहे. युनिट 3 पथकाकडुन गेल्या 28 दिवसात नायलॉन मांजा संबधी खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

– एकुण कारर्वाइ –  32 ,जप्त नायलॉन बंडल/चक-या – 1768,  एकुण जप्त मुद्देमाल  –  15,72,700/-

नायलॉन मांजा सबंधी ताब्यात घेण्यात आलेल्या एकुन 40 आरोपीताना पोलीस उपआयुक्त (डिटेक्षन)  चिन्मय पंडीत यांनी गुन्हेशखा, कार्यालय, गिटटीखदान या ठिकाणी बोलावून ते नायलॉन मांजा हा मानवी जिवतास व पर्यावरणास धोकादाक असले बाबत सांगुनत्यांचे समुपदेश केले  तसेच त्यांनी युनीट 3 कार्यालय भेट देवून ताब्यात घेतलेल्या 12 आरोपीतांकडे चौकशी केली .

– कारवाई अधिक तिव्र करणार 

मकर संक्रांत काही दिवसांवर आली असल्याने नायलॉन मांजा विक्री करणारे/जवळ बाळगारे/त्याचा वापर करणारे यांच्यावर कारवाई तिव्र करण्यात यते आहे. त्यामुळे नागरीकांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे तसेच नायलॉन मांझा विक्री करणाऱ्यांना  इसमांची माहिती
गुन्हेशाखेस देण्याची अवाहन करण्यात येत आहे .

सदरची कारवाई नागपूर शहराचे मा. पोलीस आयुक्त अमीतेशकुमार, मा. सहपोलीस आयुक्त  अश्वती दोरजे, मा. अपर पोलीस आयुक्त(गुन्हे)  सुनील फुलारी यांचे निर्देशान्वये  पोलीस उपायुक्त(डिटेक्षन) श्री चिन्मय पंडीत, मा. सहा. पोलीस आयुक्त(गुन्हे)  रोशन पंडीत यांचे मार्गदर्शना खाली पोनि प्रदिप रायण्णावार, सपोनि पवन मोरे, सपोनि नेरकर, पोहवा. ईश्वर खोरडे, रामचंद्र कारेमोरे, श्याम अंगुथलेवार, विजय श्रिवास, दशरथ मिश्रा, अनील जैन, मिलींद चौधरी, नापोषि टप्पुलाल चुटे, अनुप तायवाडे, सतीष पांडे, फिरोज शेख, पो.अ. रविंद्र करदाते, अनिल बोटरे, संतोश चौधरी, मंगेश मडावी, दिपक लाकडे, म.पो.शि. वर्शा हटवार यांनी केली आहे.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्टलसह काडतुस जप्त

Sun Jan 9 , 2022
नागपुर -गुन्हे शाखा यूनिट क्र. ५  यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमीवरून स्टाफ व पंचासमक्ष आरोपी शाहरूख खान मोहम्मद शरीफ खान वय 28 वर्ष रा. ताजनगर, टेका नाका, पाचपावली यास ताब्यात घेउन त्याची अंगझडती जप्ती पंचनामा कारवाई करून एक लोखंडी गावठी बनावटीचे लोंखडी धातुचे व लाकडी मुठीचे आवरण असलेले अग्नीशस्त्र कि. अं. 10,000/- रू व एक पिवळया धातुचा जिवंत काडतुस रू. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com