कन्हान :- न्यु गोंडेगाव (पुनर्वसन) येथील खेळाच्या मैदानावर नूतन सरस्वती विद्यालय, कनिष्ठ महाविद्या लय व सरस्वती कॉन्व्हेंट कांद्री-कन्हान व्दारे शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न करण्यात आल्या.
मंगळवार (दि. २४) डिसेंबर ला नूतन सरस्वती विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व सरस्वती कॉन्व्हेंट कांद्री – कन्हान व्दारे न्यू गोंडेगाव (पुनर्वसन) येथील खेळाच्या मैदानावर शालेय क्रीडा स्पर्धेचे मा. सुनील कुमार धुरिया उपसरपंच ग्रा पं गोंडेगाव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी साहिल गजभिये सदस्य ग्रा पं गोंडेगाव, वामन मन्ने मुख्याध्यापक नुतन सरस्वती विद्यालय कांद्री, मान्यवर पालक व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यानी कबड्डी, खो-खो, लंगडी, लांब उडी, उंच उडी, धावनी अश्या विविध खेळात सहभाग घेतला. विजय चंमु व विद्यार्थ्याना बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. क्रिडा स्पर्धेच्या यश स्वितेकरिता मुख्याध्यापक वामन मन्ने सर, नागेश चिंचु लकर सर, चौरे सर, चिंचुलकर सर सह सर्व शिक्षक, शिक्षिका व शालेय विद्यार्थ्यानी सहकार्य केले.