आता पेटंट फेस्ट नंतर ‘नागपूर शार्क टँक’ हा कार्यक्रम घ्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– पेटंट फेस्टचा थाटात समारोप

नागपूर :- सगळ्या नव्या संकल्पना पेटंट झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना व्यावसायिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप देखील दिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर त्यांनी, पेटंट फेस्टच्या यशस्वी आयोजनानंतर या कार्यक्रमाची पुढची आवृत्ती म्हणून ‘नागपूर शार्क टँक’ हा कार्यक्रम घेण्याची ‘आयडिया’  देखील आयोजकांना दिली. ते सुरेश भट सभागृहात आयोजित पेटंट आणि आयडिया फेस्टच्या पुरस्कार समारोहात बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य आ. कृष्णा खोपडे, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे सचिव मनोज चव्हाण आणि कोषाध्यक्ष डॉ. योगिता कस्तुरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप हब म्हणून भारताकडे पाहिले जाते. हल्दी घाटीची लढाई आणि अमेरिकेसोबतची हळदीच्या पेटंटची लढाई दोन्ही महत्वाचे आहेत. ती लढाई जेव्हा आपण जिंकलो तेव्हा आपल्याला पेटंटचे महत्व लक्षात आले. १६००० startups एकट्या भारताचे आहेत. वेळ वाचविणे खूप महत्वाचे आहे. प्रवासाचा वेळ आणि माहितीचा वेग हा यांचे महत्व मोठे आहे. यांतून पैशांची बचत होते. विचारांचे पंख असणाऱ्या तरुणाईच्या बळावरच आज आपले पंतप्रधान ६ जी सर्वप्रथम भारतात आणण्याबद्दल ठामपणे सांगतात. चॅट-जीपीटी सारख्या ए आय प्लॅटफॉर्म मुळे माहितीच्या जगात मोठी क्रांती झाली आहे. जगातील सर्व बुध्दीमत्ता सार घेऊन ते आपल्याला हवा असलेली माहिती क्षणात उपलब्ध करून देते. लोकांच्या जीवनात ease of living आणण्याचं आहे आणि या नव्या संकल्पना आणि पेटंटस आदींना बळ देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. लर्न, अनलर्न आणि रीलर्न या पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, Intellectual property rights मुळे नव्या संकल्पनांतून होणारा फायदा जगभरात पोहोचतो आहे. पेटंट हे संकल्पना आणि संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नवे उद्योजक, तसेच अन्य क्षेत्रातील लोक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा नवा प्रयत्न आपल्याला करायलाच पाहिजे. या विषयात कायदा सुध्दा बनला पाहिजे. नवनव्या आयडियाज आणि संशोधन यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे आणि ते या प्रयोगाने होईल यात शंका नाही असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पेटंट महोत्सवाची व्याप्ती इतकी होईल याचा विचार केला नव्हता. १२०० हून अधिक ४५० पेक्षा अधिक पेटंटस् आलेत. १०+ पेटंट नावावर असलेल्यांना जेव्हा शोधायला गेलो तेव्हा लक्षात आले की नागपूर शहरात एक व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या नावावर ५२ पेटंट आहेत, त्याखालोखाल ३५ आहेत. त्यांनी पेटंट फेस्टच्या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला.

मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘पेटंट फेस्ट’ या उपक्रमाला सहकार्य करण्याऱ्या सर्व प्रायोजकांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये नागपूर महानगर पालिका, विश्वराज एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड, वर्ल्ड ट्रेंड सेन्टर – नागपूर, हॉटेल अशोका, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अश्मी समूह, गोएलगंगा समूह, ‘एन्लायटन द सोल’ चे राजकुमार चावला, पीआर टाइम्सचे निखिलेश सावरकर यांचा समावेश होता.

विशेष पुरस्कार डॉ. नितीन लाभसेटवार (जेष्ठ वैज्ञानिक, नीरी, नागपूर), ज्ञानेश्वर कांबळे (आयपीआर कन्सलटन्ट, टीसीएस) यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते व्हिजन नेक्स्टच्या ‘पेटंट फेस्ट’ वरील सचित्र अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना आणि संशोधन यांकरिता ५ शैक्षणिक संस्थांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये दत्ता मेघे महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर, व्हीएसपीएम दंत महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजनिअरिंग यांचा समावेश होता.

नागपूर शहरातील १०+ पेटंट्स धारकांना देखील येथे गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. अजय गदीछा, डॉ. पद्मनाभ गाडगे, निलेश आवटे, अजिंक्य कोटावार, संजय ढोबळे, विजय उपाध्ये, डॉ. जी. के. आवारी, डॉ. एस. ए. तेलंग, डॉ. एस. डी. ठाकरे, संदीप खेडकर, डॉ. राहुल पेठे, डॉ. भालचंद्र हरदास, डॉ. संदीप जोशी, डॉ. लोकेश हेडा यांचा सन्मान करण्यात आला.

तर सर्वोत्कृष्ट १० पेटंटसमध्ये डॉ. अभय कोलते आणि चमू (इम्प्लांट प्लेसमेंट ड्राईव्ह), वेदांत पुल्लिवार (कॉम्पॅक्ट स्कूटर), शुभेंद्रसिंग ठाकूर (अर्ली डिटेक्शन ऑफ ओरल कॅन्सर), गणेश शेठ या अंड हरीश (बॅकवॉश+ क्लॉगिंग वॉटर), आकाश पोटे व मकरंद लोखंडे (सोलार कुकर), डॉक्टर नितीन लुटे व अंकुश (मायक्रोवेव्ह मेकॅनिकल फिबो), डॉक्टर अनिल ओंकार अप्रेटस ऑफ बेडरिडन, डॉक्टर अजित श्रीवास्तव (ग्राफाईन फ्रॉम वेस्ट बॅटरी), आलोक पाठक आणि सतीश कुलकर्णी केमिकल फ्री मेडिकल डिस्पोजेबल डॉक्टर आशिष बढिया आणि डॉक्टर नीती (फॉरेन्सिक बरण्ट डाटा एक्स्ट्रॅक्ट), डॉक्टर सचिन मरडागावणे, डॉक्टर रोशन साखरकर (फ्लेक्झिबल बर) यांना सर्वोत्कृष्ट आयडियाज विभागात तर डॉक्टर वृंदा कोलते (सुथर्स मटेरियल), डॉक्टर धनंजय तुटकाने (इंडक्शन मोटर फॉर फॅन), प्रज्वल ढोले (बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑरेंज पिल्स), शुभम पाटील (युनिकनेक्ट), अमन पाटील आणि चमू (बियोंड ब्रेल मोबिलिटी जॅकेट), पवन कुमार (पोलाराइज्ड लाईट), शिरीष गवई (सक्शन बॅग दिस्पोजेबल), डॉ. अपूर्वा मिश्रा ( antiseptick dispensing surgical glow), देवयानी धोगोडे (३ d प्रिंटेड paws bone tissue), गरुडा-सार्थक, पिंकी गंगवाणी (English to language special translator), मिस आर्या डगवार (एअर pollution) यांचा समावेश होता. ही सर्व बक्षिसे वेदिक (सेंटर ऑफ एक्सलंस फॉर स्किल डेव्हलपमेंट) यांच्याद्वारे प्रायोजित होती.

उपस्थित मान्यवर पाहुणे आणि बुद्धिवंत आणि दर्शकांचे आभार व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनचे सचिव मनोज चव्हाण यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार सुधाकर अडबाले व्यवस्थापन परिषदेवर

Tue Aug 15 , 2023
– कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ   विधानपरिषदेच्या उपसभापतींनी केली निवड नागपूर :- विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची राज्यातील एकमेव रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी ही नियुक्ती केली असून, राज्याचे अवर सचिव पुष्पा दळवी यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com