आता संत्र्याच्या बागा चोरांच्या निशाण्यावर

– पुसगोंदी येथील संत्र्याच्या बागेत चोरी

– अंदाजे १.५ लाख रुपयांचे नुकसान

कोंढाळी :- २०/२१ मार्च रोजी रात्री अंदाजे १२ ते १ च्या दरम्यान, येथून आठ किमी अंतरावर असलेल्या पुसगोंदी (बडातांडा) येथील शेतकरी करण बादल सिंग राठोड यांच्या संत्र्याच्या बागेतून चोरांनी एका वाहनातून दोन टन संत्री भरली आणि चोरून नेली. तर रात्री संत्र्या तोडताना अंदाजे एक टन संत्री खाली पडली. एकूण, संत्र्या उत्पादक शेतकऱ्याचे चोरांनी १.२५ ते १.५ लाख रुपयांचे नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.संत्रा बागायती मधुन संत्रा चोरट्या गैंग ने संत्रा चोरून नेल्याचे कळल्यानंतर कोंढाळी पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसागोंदी (बडातांडा) येथील करण बादल सिंग राठोड यांच्या संत्राच्या बागेत, २०/२१ मार्च रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान, संत्रा चोरांच्या अज्ञात टोळीने वाहनाने आलेल्या सुमारे १५/१६ संत्रा तोडणाऱ्या चोरट्यांनी बागेतून तीन टन संत्री तोडली. चोरीला गेलेली संत्री तोडत असताना, एक टन संत्री खाली पडली आणि नुकसान झाले, तर दोन टन संत्री गाडीत भरून चोरून नेली . दरम्यान, संत्रा बागेच्या दुसऱ्या टोकावर रात्रीच्या पहाऱ्यावर असलेले ६५ वर्षीय खेम सिंग चव्हाण यांना कोणीतरी बागेत आल्याचा संशय आला आणि त्यांनी बागेत हाक मारली, तेव्हा संत्रा चोरांच्या टोळीने बागेच्या चौकीदाराला धमकावले आणि त्याला गप्प राहण्यास सांगितले. यानंतर, संत्री चोरांच्या टोळीने संत्री गाडी भरली आणि सर्व १५/१६ चोर अंदाजे दोन टन संत्री घेऊन पळून गेले.

संत्रा चोर टोळी निघून गेल्यानंतर, संत्रा बागायतदाराने २१ मार्च रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास कोंढाळी पोलिसांना ही बाब कळवली. घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार राजकुमार त्रिपाठी आणि कर्तव्यावर असलेले कर्मचारी रात्री पुसागोंदी (बडातांडा) येथे पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज ची पाहनी केले जात आहे. संत्रा बागेतील शेतकरी करण राठोड यांनी अंदाजे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख आणि एएसआय शैलेंद्र नागरे पुढील तपास करत आहेत.

कृषी मित्र दिनेश ठाकरे यांनी सांगितले की, संत्र्यांना चांगला भाव मिळत आहे. ज्या संत्रा बागायतदारांच्या बागेत संत्रा पिके उभी आहेत, त्यांनी त्यांच्या बागेची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात द्यावी आणि पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूरकरांचे हित साधणारा अर्थसंकल्प - ॲड. धर्मपाल मेश्राम

Sat Mar 22 , 2025
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५४३८.६१ कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. करवाढीचे ओझे न लादून आयुक्तांनी नागपूरकरांचे हित साधणारा अर्थसंकल्प सादर केला, अशी प्रतिक्रीया माजी नगरसेवक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर दिली. देशात प्रथमच डबल डेकर पाण्याची टाकी नागपुरात साकारली जाणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!