कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०५/१०/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड अलक्षीत राजेश अंबादे, वय २६ वर्ष रा. लश्करीबाग, समता मैदान शितला माता मंदिरजवळ, पो. स्टे, पांचपावली, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाच्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८९ अंतर्गत दिनांक ०५/१०/२०२२ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ०५/१०/२०२२ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

अलक्षीत राजेश अंबादे याचे विरुद्ध पोलीस स्टेशन पांचपावली येथे प्राणघातक शस्त्र घेऊन गैरकायदेशीर मंडळी जमवुन खून करणे, फौजदारी कट रचणे, खूनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्राने स्वेच्छेने दुखापत करणे, स्वेच्छेने दुखापत करणे, दरोडा घालणे, दरोडा घालण्याची तयारी करणे, दरोडा करण्याच्या उद्देशाने एकत्र जमणे, खंडणी वसुल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा करणे, समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक पटक दोषी असणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, प्राणपातक शस्त्रानिशी फिरणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थांची विकी करणे आणि ताब्यात ठेवणे, जबरी चोरी करताना स्वेच्छेने दुखापत करणे. मालमत्तेचे नुकसान करणे, इत्यादी मालमत्तेविरुध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे त्याचेवर पाचपावली पोलीसांकडून सन २०२० व २०२२ मध्ये दोन वेळा कलम १२० सीआरपीसी नुसार प्रतिबंध कारवाई बंधपत्र घेण्यात आले होते तरीसुद्धा तो गुन्हे करित असल्याने त्याला सन २०२२ मध्ये एमपीडीए कायदया अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले होते. स्थानबध्दतेतुन सुटल्यानंतर सुध्दा त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली व त्याने पोलीस स्टेशन पांचपावली हद्दीत जबरी चोरी करतांना दुखापत करणे. मालमत्तेचे नुकसान करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्रानिशी फिरणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अलक्षीत राजेश अंबादे, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाहत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन पांचपावली नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थान प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरुध्द स्थानबद्धतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

Fri Oct 6 , 2023
नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २८ केस व एन.डी.पी.एस. अन्वये ०१ केस असे एकूण ०९ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमावर कारवाई करून रु. १५,०१५/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला, जुगार कायदा अन्यये २५ केस मध्ये १३ इसमावर कारवाई करून रु ७१५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमाखाली एकूण ३२१७ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com