नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २१.१०.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे राहुल वल्द अनिल खोब्रागडे, वय २६ वर्ष रा. प्लॉट नं. ८६-ब, अबिडकर चौक, साधु मोहल्ला, पो. ठाणे. जरीपटका नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक २१.१०.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. २१.१०.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
राहुल वल्द अनिल खोब्रागडे, याने पोलीस ठाणे जरीपटका नागपूर चे हद्दीत खुन करण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, क्षती पोहचवीण्याची भीती दाखवुन खंडणी मागणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याचे उद्देशाने जाणिवपुर्वक अपमान करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अपराधीक जिवे मारण्याची धमकी देणे, अपराधाचा पुरावा नष्ट करणे, गैरनिरोध करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरुध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानवच्द इसमाविरूध्द सन २०१९, व २०२१ मध्ये ११०(ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यास सन २०१८ व २०२० मध्ये दोन वेळा एमपीडीए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्यात आले होते, तरीही त्याने स्थानबध्दतेतुन सुटल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवल्याने स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२३ मध्ये कलम ११० (ई) (ग) सी.आर. पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. त्याचेकडुन रु. ४०,०००/- रक्कमेचे ०२ वर्ष मुदतीकरीता चांगल्या वर्तणुकीसाठी अंतीम बंधपत्र घेण्यात आले. परंतु प्र. स्था. इसमाने सदर प्रतिबंधक कारवाईचे उल्लंघन करून अलीकडील काळात पो. ठाणे जरीपटका हददीत गैरनिरोध करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उदद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे राहुल वल्द अनिल खोब्रागडे, याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक मुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी. ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूष्ट स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.