नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०९.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे बेलतरोडी, राणाप्रतापनगर, एमआयडीसी, सोनेगांव, धंतोली व इमामवाडा नागपूर शहर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे हर्षल राकेश ब्राम्हणे, वय २४ वर्ग, रा. एलॉट नं. २२, दाते ले आऊट, इंद्रप्रस्थनगर, पो.ठा. सोनेगांव, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम् १९८१ अंतर्गत दिनांक ०९.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ०९.०७.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
हर्षल राकेश ब्राम्हणे याचे विरूध्द पोलीस ठाणे बेलतरोडी, राणाप्रतापनगर, एमआयडीसी, सोनेगांव, धंतोली व इमामबाडा नागपूर येथे खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्वासह गैर कायदयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, प्राणघातक शरखाने गंभीर दुखापत करणे, गैर निरोध करणे, अश्लिल शिवीगाळ करून दुखातपत करणे, अपराधिक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, स्त्रीचा विनयभंग करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग करण्याचे उदद्देशाने अपमान करणे, आपखुशीने घातक शस्वाने दुखापत करणे, गृह अतिक्रमण करून घातक शस्वाने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्लेविरूध्दचे तसेच शरीराविरूध्दये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे त्याचेवर सन् २०२२ मध्ये राणाप्रतापनगर पोलीसांकडून कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने सन २०२३ मध्ये एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्यात आले होते. परंतु त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे इमामवाडा, राणाप्रतापनगर व बेलतरोडी हद्दीत प्राणघातक शस्त्रासह गैर कायदयाची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, गैर निरोध करणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उददेशाने अपमान करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे इत्यादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा एमपीडीए कायदयातंर्गत स्थानबध्दतची कारवाई करण्यात आली आहे.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे हर्षल राकेश ब्राम्हणे, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे राणाप्रतापनगर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूष्ट स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे,