नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २७/१२/२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये जरीपटका व कपीलनगर पोलीस ठाणे चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अंकित उर्फ गांज्या वल्द जयनाथ चव्हाण, वय ३१ वर्ष, रा. प्लॉट नं. २०८, अंगुलीमाल नगर, पाटणकर चौक, पो. ठाणे जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक २७/१२/२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक २७/१२/२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अंकित उर्फ गांज्या वल्द जयनाथ चव्हाण यानेविरूध्द जरीपटका व कपीलनगर पोलीस ठाणे नागपूर शहर येथे खुन करण्याचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, प्राणघातक शरखाने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, छुपा पाठलाग करणे, अश्लिल शिवीगाळी करणे, आपराधीक जिवे ठार माण्याची धमकी देणे, गैरनिरोध करणे, शांतता भंग करण्याचे उददेशाने जाणिवपुर्वक अपमान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई व हदपार आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरूध्द जरीपटका पोलीसांकडून १) सन २०१६ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी, अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २) पोलीस उप आयुक्त, परि. क. ५ यांनी सदर स्था. इसमास २ वर्षाकरिता हदपार केले होते, परंतु त्याचेवर केलेलल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही, त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवले, त्यामुळे त्यास ३) सन २०१९ मध्ये एमपीडीए अंतर्गत ०१ वर्षांकरिता स्थानबध्द करण्यात आले होते, त्यानंतर कपोलनगर व जरीपटका पोलीसांकडून ४) सन २०२१ व २०२३ मध्ये कलम ११०(ई) (ग) सीआरपीसी, अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे कपीलनगर येथे आपखुशीने गंभीर दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, गैरनिरोध करणे, आपराधीक जिवे ठार माण्याची धमकी देणे, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अंकित उर्फ गांज्या वल्द जयनाथ चव्हाण याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे कपोलनगर, नागपूर शहर यांनी नमूद आरोपीतास स्थानवध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्यये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असत्ता, त्यांनी वर नमूद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.