कुख्यात गुंड स्थानबद्ध

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २४.१२.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे तुशार उर्फ भांज्या वल्द रामेश्वर बिसेन, वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. ३५. शामनगर, पुनापुर रोड, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक २४.१२.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक २४१२. २०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

तुशार उर्फ भांज्या वल्द रामेश्वर बिसेन, याचे विरूध्द पोलीस ठाणे पारडी नागपूर शहर येथे कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करणे, कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करणे, राहते घर इत्यादीतील चोरी करणे, अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता मिळविणे, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र येणे, सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान महामार्गावर चोरी करणे, गैर परिरोध करणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे. प्राणघातक शस्खे घेऊन फिरणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, ईत्यादी, मालमत्ता आणि शरीराविरूध्दने गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२४ मध्ये कलम ११०(ई), (ग) सी.आर.पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन त्यानेकडून चांगल्या वर्तणुकीबाबत बंधपत्र घेतले होते. परंतु सदरहु स्थानबध्द इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन केले आहे. अलीकडील काळात सदर स्थानबध्द इसमाने पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर हद्यीत सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान महामार्गावर चोरी करणे, गैर परिरोध करणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे इत्यादी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे तुशार उर्फ भांज्या वल्द रामेश्वर बिसेन याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस वाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास छत्रपती संभाजीनगर, मध्यवर्ती कारागृह, हर्मुल येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Thu Dec 26 , 2024
नागपूर :- दिनांक २४.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसमध्ये, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ६४,२५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १० ईसमावर कारवाई करून रू. ६४,९७५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!