कुख्यात गुंड स्थानबद्ध

नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ११.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे तहसिल, गणेशपेठ व कपीलनगर, नागपूर ने ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे मोहम्मद अरबाज उर्फ सानु वल्द मोहम्मद इसराईल उर्फ मांजा अंसारी, वय २८ वर्षे, रा. कमलबाबा दर्गाहजवळ, मोमीनपुरा, पोलीस ठाणे तहसिल, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक ११.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक ११,०७,२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

मोहम्मद अरबाज उर्फ सानु वल्द मोहम्मद इसराईल उर्फ मांजा अंसारी याचेविरूध्द पोलीस ठाणे तहसिल, गणेशपेठ व कपीलनगर येथे खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारपिट करणे, खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला मूत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, स्वीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र वलप्रयोग करणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करतांना दुखापत करणे, दरोडयाची पूर्व तयारी करणे, दरोडा टाकणे करीता एकत्र जमणे, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, अपराधीक जीवे मारण्याची धमकी देणे, आपखुशीने प्राणघातक शस्वाने दुखापत करणे, बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्रासह सज्ज होऊन दंगा करणे, समान उदीष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधावद्दल बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे, फौजदारीपात्र कट रचणे, गुन्हा करण्याकरीता उत्प्रेरक करणे, गैरवर्तण करणे, जीवे मारण्याची धमकी देवुन शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भीती घालणे, प्राणघातक अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरुध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०१६, २०१८ व २०२० मध्ये पोलीस ठाणे तहसील पोलीसांकडुन कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच स्थानबध्द इसमास २०१७, २०१८, २०२१ व २०२३ मध्ये असे चार वेळा एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्यात आले होते. परंतु, नमुद प्रतिबंधक कारवाई व एम.पी.डी.ए कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या स्थानबध्द कारवाईचा त्याचेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याने पुन्हा जोमाने गुन्हे करणे सुरूच ठेवले आहे. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे तहसिल हद्दीत खखंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती पालणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भीती घालणे, अश्लिल शिवीगाळ करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, सार्वजनीक जागेवर मारपीट करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे मोहम्मद अरबाज उर्फ सानु वल्द मोहम्मद इसराईल उर्फ मांजा अंसारी, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे तहसील, नागपूर शहर यांनी नमूद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हे शाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानवध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी तसेच वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०७ गुन्हे उघडकीस

Fri Jul 12 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान हहीत, हजारी पहाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी श्वेता चंद्रमणी देशभ्रतार, वय २७ वर्षे, यांनी त्यांची अॅक्टीव्हा गाडी क. एम.ए ३१ एफ.डी ११५३५ किंमती ५०,०००/- रू ची पोलीस मुख्यालय येथील शिवाजी मैदान येथे लॉक करून पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची अॅक्टीव्हा गाडी चोरून नेली. फिर्यादी यानी अशा दिलेल्या तकारीवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!