नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ३१,०७,२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे एमआयडीसी, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुड नामे दुर्गेश नभुचंद टेंभरे, वय २८ वर्ष, रा. इंदीरा माता नगर, वार्ड नं ६ पो. ठाणे एमआयडीसी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाच्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक ३१.०७.२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ०१.०८.२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
दुर्गेश नमुचंद टेंभरे, याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे खून करण्याचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे. दरोडा घालण्याची पूर्व तयारी करणे, दरोडा पालण्यासाठी एकत्र जमणे,जबरीचोरी करणे,शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, अपराधक धमकी देणे,प्राणघातक शस्त्रानिशी फिरणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूदचे तसेच शरीराविरूदचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरुद्ध मध्ये २०२२ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने पुन्हा जोमाने गुन्हे करणे सुरूच ठेवले, वर नमुद स्थानबध्द इसमाने सन २०२३ मध्ये दोन गंभिर स्वरूपाचे गुन्हे केले असून ज्यामध्ये शिवीगाळ करून हातबुक्काने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देवून जबरीने पैसे हिसकावून घेणे, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघन करणे अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे दुर्गेशनचंद टेंभरे यांची अपराधीक कृत्ये निरंतर वाहत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी नागपूर शहर यांनी नमूद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी. डी. ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानकतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरुध्द स्थानवतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.