कुख्यात कोळसा माफिया यास ६ महीन्यासाठी नागपुर ग्रामीण जिल्हयातून हद्दपार

कन्हान :- पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार ” भुजंग जनार्धन महल्ले याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहशतीचे प्रभाव संपविण्याचे उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६(१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये इस्तगासा तयार करून मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे पाठविण्यात आले होते.

सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी सुनावनी अखेर सदर इसमास नागपुर ग्रामीण जिल्हयातुन ६ महीन्यासाठी हद्दपार केल्याचे आदेश पारित केल्याने सदर इसमावर सदरचे आदेश तामील करून त्यास त्याचे नातेवाईकांकडे तुमसर जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण  हर्ष ए. पोदार, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण संदीप पखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदशनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सपोनि / वेतनसिंह चौहाण, पोवा / जमाल मुदस्सर, हरिष सोनभद्रे, पोना / अमोल नागरे, अनिल यादव, पोशि/ अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, नवीन पाटील यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या दोन टिप्पर चालकाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

Thu Sep 21 , 2023
कुही :- दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, पाचगाव फाटा येथे अवैध रित्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशी माहिती मुखवीरद्वारे मिळाल्याने नमुद घटनास्थळावर नाकाबंदी केली असता १) टिप्पर क्र. MH40 CM 6276 २) टिप्पर क्र. MH40 CD 6276 येतांनी दिसले. टुकचा चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com