कोदामेंढी :- सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असून जिल्ह्या जिल्ह्यात ,तालुका तालुक्यात ,गावा गावात वारडा वारडात ,चौका चौकात व पान टपऱ्यांवर , घरोघरी फक्त निवडणुकीच्या चर्चा होत असून संपूर्ण वातावरण निवडणूकमय झालेला आहे. कोदामेंढी हे गाव कामठी विधानसभा क्षेत्रात येत असून या विधानसभा क्षेत्रात एकूण दहा उमेदवार उभे आहेत त्यापैकी आठ अपक्ष असून, भाजपा तर्फे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेस तर्फे सुरेश भोयर यांच्यात मुख्य लढत होणार असल्याची गावागावात चर्चा आहे. येथे बावनकुळे यांचे प्रचार पत्र त्यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले रामचंद हटवार हे घरोघरी नेऊन चार दिवसांपूर्वी पासून वाटत आहे, तर आज दिनांक 16 नोव्हेंबर शनिवारला दुपारी अडीच ते तीन दरम्यान वार्ड नंबर दोन येथील भूरु रोहित साहू (8) हा काही घरी भोयर यांचे प्रचार पत्रक वाटताना दिसला, याबाबत त्याला विचारपूस केली असता ते पत्रक जागोजागी मोठ्या प्रमाणात रोडवर पडले असून मी ते एका मुस्लिम समाजाच्या मित्राच्या सांगण्यावरून उचलून आणून आपल्या घरी दिल्याचे व इतरही घरी वाटत असल्याचे त्यांने सांगितले. भोयर यांच्या प्रचार पत्रक घरोघरी वाटण्यासाठी कोदामेंढी येथे मतदार असलेले त्यांच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाहीत का? येथे व परिसरात बावनकुळे यांच्याच माहोल असल्याचे व त्यांनी दहा वर्षांपूर्वी आमदार असताना व ऊर्जामंत्री असताना कोदामेंढीतच नव्हे तर संपूर्ण कामठी विधानसभेत अनेक विकास कामे व अनेकांचे वैयक्तिक कामे व्यापारी, दुकानदार ,युवा व सामान्य मतदार आशिष नागपुरे, कृष्णा मसराम, मारुती हटवार, दीपक बावनकुळे सह अनेक मतदार सांगत असल्याने , सुरेश भोयर यांनी यंदा कोदामेंढीत प्रचार कार्यालय खोलूनही, काँग्रेसच्या माहोल नसल्याने काँग्रेसचे मतदार असलेले कार्यकर्ते सुस्त तर पडले नाही ना? असा सवाल या निमित्ताने मतदारांना पडला आहे.
आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मुरमाडी येथील अपक्ष उमेदवार बंटी झोडावणे (जहाज), मौदा येथील साप्ताहिक राष्ट्रनीतीचे संपादक व पत्रकार रघुनाथ सहारे(कपाट), बसपाचे इंजि. विक्रांत मेश्राम (हत्ती) यांचेही फलक, पत्रक व भोंगे असलेल्या एक दोन चार चाकी गाड्या ,आम्ही पण कामठी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवित आहोत हे दाखवण्यासाठी दोन दिवसापूर्वीपासून काही गावात फिरताना दिसत आहेत.