संविधान कुणीही बदलवू शकत नाही ही सुलेखाताई ची गॅरंटी-माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

-क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा शुभारंभ

कामठी ता प्र 11- दलित, अल्पसंख्याक,मागासवर्गीय, दिवासी, शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार ,भटक्या विमुक्त जाती, महिला आणि सर्व शोषित समूहाला संघटित करून शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व राजकीय न्याय हक्काच्या उद्दिष्टांची लढाई लढण्याकरिता 18 वर्षांपूर्वी ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच ‘ची स्थापना करण्यात आली असून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पित केलेल्या भारतीय संविधानानुसार भारत देशाचा राज्यकारभार चालतो आणि त्या संविधान बदलाची भाषा बोलले जात आहे मात्र हे बेभान बोलणे पूर्णपणे चुकीचे असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले संविधान हे कुणीही बदलवू शकत नाही ही सुलेखाताई ची गॅरंटी आहे असे मौलिक मत बरीएम च्या संस्थापिका माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी आज कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसर स्थित एमटीडीसी सभागृहात आयोजित बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या 18 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे,यांच्या शुभ हस्ते क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी आंबेडकरी साहित्यिक विनायकराव जामगडे, धरमपेठ सायन्स महाविद्यालयाचे माजी शाखा प्रमुख प्रा डॉ युगल रायलू,रमेश घरडे,विष्णू ठवरे, अनवर पटेल, बरीएम चे विदर्भ महासचिव अजय कदम, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर,माजी नगरसेविका सावला सिंगाडे,रेखा भावे,रजनी लिंगायत, तिलक गजभिये, रवी रंगारी,अश्फाक कुरेशी, नियाज अहमद आदी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बरीएम च्या संघटन बळकटीसाठी मौलिक असे मार्गदर्शन केले.

बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या 18 वा वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येत बरीएम पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रम माच्या यशस्वीतेसाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे विदर्भ महासचिव अजय कदम, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर,उदास बन्सोड,सावला सिंगाडे, रेखा भावे, रजनी लिंगायत, सुभाष सोमकुवर, अनुभव पाटील,सुशील तायडे आदींनी केले.कार्यक्रमाचे संचालन राहुल बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय कदम यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भर पावसात निघाली गडकरींची लोकसंवाद यात्रा

Thu Apr 11 , 2024
– उत्तर नागपुरात नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत नागपूर :- अकाली पावसामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करीत उत्तर नागपुरातील नागरिकांनी उत्साह दाखवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दणदणीत स्वागत केले आणि यात्रा यशस्वी केली.बुधवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे लोकसंवाद यात्रेबद्दल काहीशी अनिश्चितता होती. मात्र, नागरिकांच्या उत्साहावर पावसाचा काहीही परिणाम झाला नाही आणि भर पावसात गडकरींची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com