मनपाने केली वाहनधारकांची तपासणी

गिरणार चौक आणि बंगाली कॅम्प चौकात लसीकरण आणि मास्क बाबत चौकशी
चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. कोविड- १९ लस न घेतलेल्या व्यक्तींना करणास प्रवृत्त करण्यात आले.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनेवरून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आज 10 डिसेंबर रोजी गिरणार चौक आणि बंगाली कॅम्प चौकात वाहनधारकांना थांबवून लसीकरण आणि मास्क बाबत विचारपूस केली. या दरम्यान ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नव्हती, अशांना आरोग्य विभागाच्या पथकामार्फत कोविड लसीकरण देखील करण्यात आले.

शहरातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरण आपल्या दारी, लस घ्या आणि खरेदीत मिळवा सवलत, धार्मिक प्रार्थनास्थळी लसीकरण मोहीम, लस नाही तर ऑटोत प्रवेश नाही, दुकानांवर लाल स्टिकर मोहीम आदी विविध योजना राबविण्यात आल्या. या माध्यमातून लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात मदत झाली. चंद्रपूर शहरात आतापर्यंत ९४ टक्के नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून, पुढील १० दिवसात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाने मोहीम हाती घेतली आहे. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

ऊर्जामंत्र्यांनी खापरखेडा वीज केंद्रातील कन्व्हेयर बेल्टची केली पाहणी

Sat Dec 11 , 2021
वीज उत्पादन पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरीय उपाययोजना फायर ऑडीट होणार नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात ८ डिसेंबर रोजी २१० मेगावाट परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या कन्व्हेयर बेल्टला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या केंद्रातील विद्युत विषयक (ईलेक्ट्रिल) आणि अग्नीसुरक्षा विषयक (फायर) ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक(संचलन) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com