नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?

नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?

मुंबई :-  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी भेट देणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटवाईक यांना भेटले. देशात २०२४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला निवडणुकीत टक्कर देऊ शकतात. याचसंदर्भात आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. शरद पवार म्हणाले, देशातील माहौल पाहिल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी सोबत राहून काम करणे गरजेचे आहे. सोबत काम केल्यास देशाला विरोधी पक्षांचा चांगला पर्याय मिळेल. त्या पर्यायाला लोकं समर्थन देतील.

देशात दुसरा पर्याय निर्माण करू

कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल. ही कर्नाटकातचं नव्हे तर देशात स्थिती आहे. त्यासाठी आम्हाला मिळून काम करावं लागेल. देशात दुसरा पर्याय निर्माण करण्यासाठी नितीशकुमार यांनी सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात संवाद झाला आहे. दिल्लीत आम्ही बसलो होतो. नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी, मल्लीकार्जून खर्गे होते, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

विरोधी पक्षांचे लवकरच एकत्रीकरण

विरोधी पक्षांच्या एकत्रिकरणाचे लवकरच नामकरण करू. बहुतेक सर्व विरोधी पक्ष सोबत आहोत. शरद पवार यांना भेटलो. शरद पवार यांनी नुकताच दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. तो खूप चांगला निर्णय आहे. देशासाठी त्यांना काम करायचं आहे. देशाच्या हितासाठी सोबत काम करणार असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं.

आधी चर्चा नंतर चेहरा

शरद पवार हे विरोधकांचा चेहरा झाल्यास ही आनंदाची गोष्ट राहील, असंही नितीश कुमार म्हणाले. परंतु, आधी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ. त्यानंतर चेहरा ठरवू, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामगारांनी वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा- सीमा पांडे

Thu May 11 , 2023
नागपूर :- राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ हातमाग कामगारांनी घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम 2021-22 ते 2025-26 अंतर्गत दिशानिर्देशानुसार जीवन विमा योजनेसाठी नोंदणी केलेल्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील हातमाग कामगाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला त्याला 2 लाख रुपये विमा अनुज्ञेय आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!