नूतन सरस्वती विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी नितीन रडके तर सचिव पदी खेमराज व्यापारी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी, ता.३ : नूतन सरस्वती विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कामठीच्या सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरिता संचालक मंडळ कार्यकारिणी पदाधिकारी निवडणूक सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात आज बुधवार ३ ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री राहुल एम बावणे (उपलेखापरीक्षक) यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्ष पदावर नितीन कृष्णराव रडके, उपाध्यक्ष पूनम आनंदराव महाजन, (सौ.चिलनकर), सचिव खेमराज प्रितमराव व्यापारी व कोषाध्यक्ष पदावर सतीशकुमार सुखदेव दहाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर संचालक मंडळामध्ये नूतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामठी येथील मोहनकुमार हिरालाल गढे, करुणा रामचंद्रराव चाफले (रडके),
यशपाल गोपाल गंगराज, विजय कृष्णराव वांढरे,
नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कामठी येथील योगिता संजय गुल्हाने, जितेन्द्र केशवराव कळंबे, आशिषकुमार वामन मांदाडे, निशिगंधा अरविंद राजपोले तर नूतन सरस्वती विद्यालय कांद्री कन्हान येथील नागेश चंदू चिंचुलकर, राजेंद्र दशरथ चवरे, सुनील बाळकृष्ण चिंचुलकर यांची *कार्यकारिणी मंडळाचे संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त संचालक मंडळाचे पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

Thu Aug 4 , 2022
 नागपूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त धनंजय सुटे, तहसीलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!