परम शांती मित्र परिवार चा नववर्ष स्नेह म्मिलन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- परम शांती मित्र परिवार व्दारे गहुहिवरा रोड परम शांती चौक येथे नववर्ष स्नेह म्मिलन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित उत्साहाने साजरा करण्यात आला.

रविवार (दि.७) ला गहुहिवरा रोड स्थित परम शांती चौक येथे परम शांती मित्र परिवार कन्हान चे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव घारपिंडे यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी शहापुर तहसिल भंडारा जिल्हयाचे कवडु पाांदुरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून शिवबाबाची प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी पालंदुरे प्रवचनात संबोधिले की, मनुष्य जिवनाचा उद्देश परम शांती प्राप्त करणे आहे. आम्हाला परम शांती करिता विचार करणे, बोलणे आणि कार्य करायला पाहिजे. ज्यामुळे कुठल्याही जीवाचे वाईट न होता, तोच व्यकती मोक्ष प्राप्त करून जिवनाचा उद्देश प्राप्त करेल. या परम शांती मित्र परि वाराची स्थापना होऊन २३ वर्ष पुर्ण झाले असुन अबा धित पणे प्रतिदिवसी सकाळी ६ वाजता प्रवचनाच्या मधुर स्वरांनी नागरिकांच्या जिवनात सुख शांती नांद ण्याचा प्रर्यंत केला जातो.

या कार्यक्रमास भंडारा, उमरेड, नागपुर शहरातील मान्यवरांनी प्रामुख्याने उप स्थित होऊन शिवबाबा (शिव) विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अशोक घारड, प्रभाकर हुड, ताराचंद चरड़े, पांडुरंग भिवगडे, एकनाथ खर्चे, धनराज शेंडे, नामदेव पराते, हरिनाथ लेंडे, वामन भुसारी, आगय्या केशट्टी, राजेश भंडारे, अंकुर भिवगडे, पदमाकर पोतदार, राम गोयल, प्रल्हाद राउत, पुष्पा खर्चे, विधि विधे, ऊषा घारड, शोभा भिवगडे, मीना वानखेड़े, विमल गिरडकर आदिनी उपस्थित राहुन सहकार्य केले. शेवटी प्रसाद व भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नॉयलॉन मांजाची 34 चक्री जप्त

Tue Jan 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरात आगामी मकरसंक्रातीला पतंगबाजीला येणारे उधाण अनेकांच्या जीवावर बेतू शकत असल्याने नागपूर शहर पोलीस सरसावले आहेत. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा होणारा सर्रास वापर पाहता पोलीस सज्ज झाले आहेत.नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 च्या वतीने काल कोराडी येथील जुने मच्छि मार्केट परिसरातील दिया आईस्क्रीम पार्लर व जनरल स्टोर वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com