बोरखेडी सरपंच चषक मध्ये न्यू व्हिजन क्रीडा मंडळ विजयी..

संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी

दोन गुणांच्या निसटत्या फरकाने माँ अनुसया क्रीडा मंडळ पराभूत

नागपूर – १९ डिसें :- तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथे जय बजरंग क्रीडा मंडळ द्वारा आयोजित “सरपंच चषक” खुल्या कब्बडी स्पर्धेत बुटीबोरी येथील न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लब ने अवघ्या दोन गुणांच्या फरकाने माँ अनुसया क्रीडा मंडळ,दुधा या संघावर विजय संपादित करून सरपंच चषकावर आपले नाव कोरले.

बोरखेडी (रेल्वे) येथे गत दहा वर्षांपासून कब्बडी चे भव्य आयोजन केले जात असून सरपंच राजू घाटे हे ग्रामीण भागातील खेळाडूंना अंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्तम असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे.या स्पर्धेत एकूण ३५ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यापैकी न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लब,बुटीबोरी व माँ अनुसया क्रीडा मंडळ,दुधा यांच्यात अत्यंत चुरशी च्या झालेल्या अंतिम सामन्यात १४-१२ अशा दोन गुणांच्या फरकाने न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लब ने निसटता विजय संपादन करून कबड्डीच्या सरपंच चषकावर आपले नाव कोरले.या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार २२,२२२ रुपये जय बजरंग क्रीडा मंडळ कडून,द्वितीय पुरस्कार १७,७७७ रुपये स्व कालिदास गुप्ता स्मृती प्रित्यर्थ सौरव गुप्ता यांचेकडून, तृतीय पुरस्कार ११,१११ रुपये जलसा ढाबा,पप्पू मोहारे यांचेकडून तर चतुर्थ पुरस्कार ५५५५ रुपये रामदास भोजने यांचेकडून विजेत्या व उपविजेत्या संघाना भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर लेंडे,बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे,माजी जी प सदस्य रुपराव शिंगणे,सरपंच राजू घाटे व भाजप महामंत्री अनिल ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बोरखेडी (रेल्वे) ग्रा प चे माजी सरपंच कृष्णा ढोके,माजी उपसरपंच अशोक मानकर,रामदास भोजने,पप्पू मोहारे, सौरव गुप्ता,रमेश झाकणेकर,शंकर पाचंगे,शंकर भोजने, विठ्ठल भोजने,भास्कर मेहरकुरे,सतीश धुर्वे,सागर घूगल, सुधाकर पानघाटे,अलकेश ढोके आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पत्नीच्या विरहात पतीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या..

Mon Dec 19 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादव नगर रहिवासी विवाहित तरुणाने सहा महिन्यांपासून सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून मृतकाचे नाव जितेंद्र रामाच्या मिश्रा वय 35 वर्षे रा. यादव नगर कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून मागील सहा महिन्यांपूर्वी पत्नी घर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com