चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्यांची टोळी अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रोड वर मागील काही दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून पोलिसांनी या कारवाहीतुन चोरट्यांची टोळीला अटक करीत त्यांच्याकडून 3 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची कारवाही आज करण्यात आली.

यातील अटक आरोपीमध्ये गणेश दांडेकर वय 23 वर्षे,शंकर वडस्कर वय 42 वर्षे,गँगन्ना दांडेकर वय 28 वर्षे,नौशाद अहमद मुक्तार अहमद वय 30 वर्षे रा पिली नदी नागपूर तसेच वरोरा रहिवासी एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जुन ला दुपारी 3 दरम्यान काही चोरटे दुचाकीने येऊन घोरपड रोड वरील सुमारें 200 मीटर कॉपर वायर किमती 1 लक्ष 80 हजार रुपयेची चोरी करीत असताना यावेळी सुरक्षारक्षक एक तर चोरट्यांची संख्या अधिक असल्याने सुरक्षा रक्षकाने टोल फ्री क्रमांक 112 वर फोन करून माहिती दिली मात्र तोवर चोरटे पळून गेले होते यांसंदर्भात फिर्यादी आर्या कांबळे वय 23 वर्षे रा घोरपड रोड कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379,34 अंनव्ये गुन्हा दाखल करून तपासकामाला गती दिली असता घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर चोरी करून गेलेला काही मुद्देमाल तर 500 मीटर अंतरावर संशयित वाहन मिळुन आले.मिळालेल्या वाहनाच्या मालकाचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले .यावर सखोल तपास केला असता या चोरी प्रकरणातील पाच ही चोरट्याचा शोध लावून अटक करण्यात पोलिसांनी यश गाठले .अटक आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची एक टोळी आहे व हे वेगवेगळ्या ठिकानाहुन तांब्याची तसेच अल्युमिनोयम चे तार चोरून भंगार खरेदी विक्री करणाऱ्या इसमास विकतात व विकलेल्या पैशाने दारू पिण्याचे व्यसन पूर्ण करतात त्यांनी यापूर्वी सुद्धा 9 जानेवारी ला कामठीतुन विद्दूत पुरवठा करणारे अल्युमिनीयम चे तार चोरून नेल्याचे सांगितले.सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपीताकडून तसेच भंगार खरेदी विक्री करणाऱ्या इसमाकडून 1 लक्ष 80 हजार रुपये किमतीचे सुमारे 200 मीटर कॉपर वायर, एक दुचाकी एम एच 34 बी डी 2285 किमती 60 हजार रुपये, एक दुचाकी एम एच 34 बी ए 2669 किमती 20 हजार रुपये,एक दुचाकी एम एच 34 सी ई 1386 किमती 80 हजार रुपये ,2400 फूट एल्युमिनियम चे सर्विस तार किमती 5 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त श्रवण दत्त ,एसीपी संतोष खांडेकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस हवा अनिल बाळराजे,संदीप सगणे, विनोद यादव,राजेश पाल,विशाल मेश्राम,सुरेंद्र शेंडे,भुपेंद्र सनोडिया, नसीम अन्सारी,विकास उईके,कमल कनोजिया,पुंडलिक परतले, मिथुन शेरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खाजगी वायरमनचा हस्तक्षेप टाळा; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

Tue Jul 11 , 2023
नागपूर :- पावसाळयामध्ये विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात, मात्र अशा प्रसंगी वीजपुरवठा त्वरीत सुरु करण्याच्या हेतूने अकुशल अशा खाजगी वायरमनव्दारे दुरूस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटना होण्याबरोबरच प्रसंगी कायमस्वरुपी अपंगत्व किंवा प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे खाजगी वायरमनचा हस्तक्षेप टाळून अपघात न होण्याच्या दृष्टीने वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सावध रहावे असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com