संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी गुमथळा मार्गावरील अजनी शिवारातील गायीच्या गोठयातून बैल जोडीची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला नवीन कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई गुरुवारला रात्री आठ वाजता सुमारास केली असून आरोपी चे नाव अलीराजा नासिर अख्तर वय 18 वर्ष राहणार लाल मदरसा वारीसपुरा कामठी असे आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजनी येथील शेतकरी शिवाजी दिवाकर वानखेडे वय 29 वर्ष यांच्या मालकीचे अजनी शिवारात गोठा असून गोठ्यात बांधलेली बैल जोडी अज्ञात आरोपीने चोरून नेऊन दुसऱ्या ठिकाणी विकली . 10 एप्रिल 2025 रोज गुरुवार ला सकाळी दहा वाजता सुमारास शेतकरी शिवाजी दिवाकर वानखेडे हे शेतातील गोट्यात गेले असता त्यांची बैल जोडी चोरीला गेल्याचे दिसून आले त्यांनी लगेच नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून चाळीस हजार रुपये किमतीची बैल जोडी चोरीला गेल्याची तक्रार केली नवीन कामठी पोलिसांनी कलम 303 (2 )बीएनएस नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारला सायंकाळी आठ वाजता सुमारास अटल जनावर चोरटा अलीराजा नाशिर अख्तर वय 18 वर्ष राहणार लाल मदरसा वारीसपुरा कामठी यास अटक केली असून त्याच्या दुसऱ्या सहकार्याचा पोलीस शोध घेत आहे आरोपी अलीरजा हा अट्टल चोरटा असून त्याचे जवडून अजून काही जनावरे चोरीचे गुन्हे उघडतील येणार असल्याचे नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले आहे वरील कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी केली.