संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विक्तुबाबा नगर कामठी येथील 12 वीतील विद्यार्थीनी वर झालेला सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खून अद्यापही कामठीवासी विसरले नाहीत, मात्र त्याच विक्तु बाबा नगरातील 13 वर्षीय अल्पवयीन 7 व्या वर्गातील विद्यार्थीनी मागील चार महिन्यापासून बेपत्ता आहे, नवीन कामठी पोलिस विभाग तपास कसोशीने करीत आहे असे सांगून मोकळे होत आहेत. तेव्हा चार महिन्यापासून बेपत्ता झालेल्या या अल्पवयीन मुलीचा शोध लावणे हे नवीन कामठी पोलिसांना आव्हान देणारे ठरत असले तरी ही अल्पवयीन मुलगी सुरक्षीत आहे की नाही या चिंतेत मूलीच्या आजीची चिंता वाढवीत आहे तेव्हा या बेपत्ता मुलीचा लवकरात लवकर शोध लावण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका संध्या उज्वल रायबोले यांनी केले आहे.
– यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की तपास कसोशीने सुरू आहे लवकरच या प्रकरणाचा छडा लावून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लावून सुखरूप तिच्या आजीच्या स्वाधीन करण्यात येईल.