कामठी तालुक्यात पसरले अवैध सावकारांचे जाळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमम)अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे मात्र हा कायदा केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.आता कामठी तालुक्यातील शहरासह ग्रामिण भागातही अवैध सावकाराचे जाळे पसरले असल्यामुळे गरजू व्यक्तींना कर्ज देऊन त्यांच्याकडून व्याज वसूल करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व सामान्य नागरिकाही मेटाकुटीस आला आहे.

गरजवंतांना मोठ्या गोडीगुलाबाणे काही रक्कम द्यायची व थोडे दिवस जाऊ द्यायचे त्यानंतर अवैध सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर लावून ते पैसे वसुल करण्यासाठी पैसे वसुलीचा तगादा लावायचा.अशा स्थितीत कर्जदार व्याज देऊ देऊ कर्जाची दुप्पट रक्कम देऊन बसतो मात्र त्या सावकारा कडून व्याजमुक्त होत नाही तेव्हा या व्याजाच्या जाचाला कंटाळून अनेकाणीं आपले घरदार व शेतीसुद्धा विकल्याचे अनेक उदाहरणे देता येतील मात्र मायबाप सरकारचा कायदा धाब्यावर बसवून अवैध सावकार लूट थांबवित नाही त्यावर संबंधित विभागाने लक्ष पुरवून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

प्रत्येकाना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैश्याची गरज भासते कधी रोगराई तर कधी कुटुंबात लग्नासाठी , कुणी अपघातात जखमी झाला तर त्याच्या उपचारासाठी सर्व सामान्यांना पैश्याची गरज भासते .जीव वाचविण्यासाठी उपचारावर अवाढव्य खर्च होतो त्यासाठी ही कर्ज घ्यावे लागते तेव्हा ही गरज गांभीर्याने घेत अवैध सावकारीवर नियंत्रण साधने गरजेचे आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात सोयीसुविधा न करताच ग्राहकांना प्लॉट विक्री जोमात

Mon Feb 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात विविध ले आऊट धारकानी मोठ्या प्रमाणात ले आउट पाडले असून प्लॉट विक्रीचा व्यवसाय थाटून बसले आहेत.परंतु प्लॉट विक्री करण्यापूर्वी नियमानुसार त्या ले आउट मध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा न करता भूखंडाची विक्री करीत असल्याने बहुतांश ग्राहकांची फसवणूक होत आहे. वास्तविकता ले आउट मालकाने या भूखंडात प्रशस्त डांबरी रस्ते,इलेक्ट्रिक डी पी, पोल, आकर्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com