नागपूर : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज उपायुक्त (विकास) अंकुश केदार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त (करमणूक) चंद्रभान पराते, तहसीलदार अरविंद शेलोकार, नाझर पवन हांडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.