जवळपास दीडशे नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-भिलगाव येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न 

कामठी ता प्र 11:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील बुद्धविहार सरूनगर येथे समाजसेवक व ग्रा प सदस्य लतेश्वरी ब्रह्मा काळे यांच्या वतीने नुकतेच आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराचा जवळपास दीडशे नागरिकानी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. .

या शिबिराला सहकार्य अरियास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हस्पिटल यांच्या वतीने आरोग्य सेवा पुरविली.या आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी तपासणी करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन लतेश्वरी ब्रम्हाजी काळे उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा नागपूर यांनी केले असून शिबिराचे उद्घाटन पुज्यनिय भन्ते बुद्धविहार भिलगाव व लतेश्वरी काळे,वकील भाई सिद्दीकी यांच्या द्वारे करण्यात आले या प्रसंगी मोहन माकडे जिल्हा परिषद सदस्य, ब्रम्हाजी काळे सामाजिक कार्यकर्ते, भाषकर भणारे होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाबर भाई, प्रीती गोलाइत, कल्पना मुलमुले, झीनत अन्सारी,मनीषा बोध्द,रानी कुकडे, अर्जिता घोष, अंजली गायकवाड, प्रज्ञा वासनिक,किशोर बागडे, बेंदले, अनुश्री खोब्रागडे, टेम्भुरने, रिंकेश मेश्राम, मनीषा धनविजय, पंचशीला बोदेले, दमयंती गणवीर, पद्मा नावाडे, मंदा मेंढेकर,पंचशीला गणवीर आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'वॉकर स्ट्रीट'वर 'वॉकर पॅराडाईज'चे ना. नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण, 'मॉर्निंग वॉक'ला येणाऱ्या नागपूरकरांचे साकारले भाव

Sat Mar 11 , 2023
नागपूर : नागपूर शहरातील वॉकर स्ट्रीटवर येणाऱ्या नागरिकांचे विविध भाव दर्शविणारे ‘स्टॅचू’ साकारलेल्या ‘वॉकर पॅराडाईज’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शुक्रवारी (ता.10) लोकार्पण झाले. याप्रसंगी माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता, जयस्वाल निको चे संचालक रमेश जयस्वाल, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे, उपाध्यक्ष डॉ. कुंदर, सचिव निशांत गांधी, कोषाध्यक्ष अभिजित मुजुमदार, सदस्य म्हैसाळकर, दत्तात्रय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com