शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या राम सातपुतेच्या विरोधात राष्ट्रवादी आमदार आक्रमक…

अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी…

मुंबई – शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली मात्र ही बाब पचनी न पडलेल्या राम सातपुतेंनी आंबेडकरांनी घटना दिली म्हणून आहे परंतु ‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’ असा एकेरी उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा तयार करता आहात का असा सवाल यावेळी केला.

राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमकच राहिले. माफी मागेपर्यंत आमदार घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपा ने ऍड.आवळे बाबुंना अभिवादन केले

Fri Mar 3 , 2023
नागपूर :-1957 लाच दीक्षाभूमीवर बुद्धाचा पुतळा व धम्म स्तंभ उभारुन दीक्षाभूमीची जागा शासनाकडून मिळवून देण्यात अग्रेसर असलेले व 14 ऑक्टोबर 1956 च्या ऐतिहासिक धम्मदीक्षेला सुप्रीम कोर्टाद्वारे कायदेशीर मान्यता मिळवून देणारे बाबासाहेबांचे सहकारी, आमदार कायदेतज्ञ ऍड. बाबू हरदास आवळे यांचा 52 वा स्मृतीदिन बसपा ने अभिवादन व माल्यार्पण करुन साजरा केला. कही हम भूल ना जाये; या अभियान अंतर्गत बहुजन समाज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com