मुंबई :- रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… रामदेवबाबा हाय हाय… समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्या रामदेव बाबाचा निषेध असो… मुखी राम राम बोला… याला जोड्याने हाणा… अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेवच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे
सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, उत्तर मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, महिला, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
बाबा रामदेवच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ;महिलांनी बाबा रामदेवच्या फोटोला जोड्याने हाणले…
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com