राष्ट्रवादी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ; प्रजासत्ताक राज्य बलवान करण्याचा कार्यक्रम आपल्यासमोर हवा – दिलीप वळसेपाटील

मुंबई दि. २६ जानेवारी – भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे तर प्रदेश कार्यालयात युवा नेते रोहित पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्य घटना मिळाली त्या राज्यघटनेतील तरतुदीचे पालन करणे त्यासाठी आग्रही राहणे आणि वेळप्रसंगी लढाई करणे यातून आपले हे प्रजासत्ताक राज्य बलवान बनवणे हा आपल्यासमोर कार्यक्रम असायला हवा असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे व युवा नेते रोहित पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, युवा नेते रोहित पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हा व सत्र न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Wed Jan 26 , 2022
नागपूर, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीनिवास बी. अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथक व उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.             यावेळी जिल्हा न्यायाधिश-1 असीम आजमे, जिल्हा न्यायाधिश-2 श्री. लाडेकर, जिल्हा न्यायाधिश-3 एस.ए.एस.एम. अली, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार, प्रबंधक विजय सोनटक्के, अधीक्षक ए. आर. खासडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com