राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण, नागपूरच्या गौरवात मानाचा तुरा

नागपूर :- भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अधिपत्त्याखाली तसेच आसाम राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आसामची राजधानी गुवाहाटी येथे नोव्हेंबर 2022 मध्ये संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी नागपूरच्या खेळाडू नयन प्रदिप सरडे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. नागपूरचा क्रीडाविश्वात गौरवाचा मानाचा तुरा रोवला. त्याने अठरा वर्ष आतील मुलांच्या गटात 110 मिटर हर्डल्स स्पर्धेत 14.37 सेंकदाची वेळ नोंदविली.

33 व्या पश्चिम विभागीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतून नयनची निवड या स्पर्धेकरिता झाली होती. नयन हा मागील तीन वर्षांपासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सुरु असलेल्या क्रीडा प्रबोधिनी, नागपूरचा खेळाडू आहे. ते दररोज सकाळ-सांयकाळ क्रीडा संकुल, मानकापुर येथे क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील, मानकापूर येथील क्रीडा मार्गदर्शीका अरुणा गंधे व क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू शमशेर खान यांचे मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

स्पर्धेतील नयनच्या कामगिरीवर क्रीडा व युवक सेवा संचालनाचे उपसंचालक तथा क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देवून कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनीही आनंद व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुटीबोरी-उमरेड मार्गावरील जडवाहतूक आऊटर रिंग रोडमार्गे सुरुच राहणार, वळतीकरणास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- मध्य रेल्वेच्या वर्धा नागपूर विभागातील बुटीबोरी-बोरखेडी स्थानकांदरम्यान दोन लेन रेल्वे ओवर ब्रिजच्या बांधकामाकरिता बुटीबोरी-उमरेड मार्गावरील जड वाहतुक इतर मार्गाकडे वळती करण्यात येणार आहे. या रेल्वे ओवर ब्रिजचे बांधकाम करण्यासाठी बुटीबोरी-उमरेड या मार्गावरील जडवाहतूक नागपूरच्या आऊटर रिंगरोड (एन.एच. 53) वरून वळती करण्यास 17 नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्यात आली होती. आता जड वाहतूक बंद करणे व वळण मार्गाची परवानगी देण्याबाबत अधिसूचनेद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com