संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
साई नगरी कांद्री येथे राजयोगीनी प्रेमलता दीदी च्या हस्ते संपन्न.
कन्हान : – साईनगरी कांदी ला प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय कन्हान सेन्टर अंतर्गत कामठी सेटर च्या राजयोगिनी ब्रम्ह कुमारी प्रेमलता दिदी च्या प्रमुख हस्ते कांद्री गावातील साईनगरी येथे विधीवत पुजा अर्चना करून नवनिर्माण ब्रम्ह कुमारी सेंटर बांध कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न करण्यात आला.
सोमवार (दि.१६) मे ला सकाळी ८ वाजता साई नगरी कांद्री येथे प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय कन्हान सेन्टर क्षेत्रांतर्गत नवनिर्माण ब्रम्ह कुमारी सेंटर बांधकामाचे भुमीपुजन कामठी सेटर च्या राजयोगिनी ब्रम्ह कुमारी प्रेमलता दिदी च्या हस्ते व कामठी केंद्र अधिनस्थ सर्व सेन्टर प्रमुख माधुरी दिदी, प्रेरणा दिदी, संगिता दिदी, वंदना बहन, शिलु बहन, प्र मुख पाहुणे शरदजी डोणेकर, डॉ श्रीकृष्ण जामोदकर, डॉ जुनघरे, वैशाली डोणेकर आदीच्या प्रमुख उपस्थि तीत विधीवत पुजा अर्चना करून करण्यात आले. या प्रसंगी राजयोगिनी ब्रम्हकुमारी प्रेमलता दिदी नी संदेश दिला कि सेन्टर मध्ये वर्षभर आध्यात्मिक, उन्नती प्रगती, सत्संग व विभिन्न विषयावर कार्यक्रम चालु राहतील. नेहमी सात्विक वातावरणात लोकाना अनुभ वता येईल असे अनेक प्रसंगाचे वर्णन करून माहीती देत मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे शरद डोणेकर डॉ जामोदकर, डॉ जुनघरे व अन्य सेंटर केन्द्र प्रमुख माधुरी दिदी, प्रेरणा दिदी, संगिता दिदी, वदना बहन, शिल बहन, कविता दिदी, वाघमारे भाऊ आदीनी आप आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध केंद्रातुन आलेल्या माधुरी दिदी, प्रेरणा दिदी, संगिता दिदी, वदना बहन, शिल बहन, कविता दिदी, वाघमारे हयाना सौगात भेट देण्यात आली. तदंतर अल्पोहार वितरण करण्यात आला. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन शिलु बहन व कविता दिदी हयानी केले. भुमीपुजन सोहळयास प्रामुख्याने पोतदार , मालविय , कमल यादव, अशोक चकोले, पप्पु गुप्ता, भोगाडे, हरिचंद्र तलोकर, कावळे ठेकेदार, किशोर गाडगे, भोगे, लक्ष्मीकांत पारधी, बब्रुवान घोडमारे, अरविंद आत्राम, भगवान धोटे, शंकर लक्षणे, ईश्वर मदनकर, शंकर ठाकरे, पराते भाई, सुनिल, प्रदीप देशमुख, सौरभ डोणेकर, पियुष डोणेकर, वैष्णव डोणेकर, कृष्णा किरपान, मारोती आष्टनकर, पदमाताई, जीजाताई, मनिषाताई, आत्रामताई, चित्राताई, कुंभलकरताई, कल्पनाताई, गायकवाडताई, मायाताई, किरपान ताई, केने माता, मोडे माता, वैद्य माता, कामडे माता, गुप्ता माता, गौरी बहन, शुक्ला बहन सह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.