संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील सोनू मोनू कंपनिसमोरून 10 चाकी कंटेनर क्र एम पी 04 एच ई 9664 ने अवैधरित्या 61 गोवंश जनावरे कत्तलीसाठी वाहून नेत असता सापळा रचून बसलेल्या नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर कंटेनर ताब्यात घेऊन कत्तलीसाठी कत्तलखान्यात वाहून नेत असलेले 61 गोवंश जनावराना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री दोन दरम्यान केली असून या धाडीतून सहा आरोपी विरुद्ध भादवी कलम प्राणी छळ अधिनियम 1960 11 1 घ ड च सहकलम महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 (अ )5(ब )9,9(अ ) सहकलम मोटर अधिनियम 1988 कलम83,177 सहकलम 34,109 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले.
अटक आरोपी मध्ये मोहम्मद जाकीर मोहम्मद जहिर वय 33 वर्षे रा भोपाल, मध्य प्रदेश, मोहम्मद नौशाद वल्लभ मोहम्मद शमशाद वय 30 वर्ष राहणार रायरादगान मध्य प्रदेश , मोहम्मद सारिख मोहम्मद खलील वय 30वर्ष रा बाग परत अब्जा गेट भोपाल, मध्य प्रदेश, साबीर शेख सलीम शेख वय 35 वर्ष राहणार बाग परत अब्जा गेट, भोपाल मध्य प्रदेश, यामध्ये आरोपी दहा चाकी कंटेनर क्रमांक MP04-HE9664 चा मालक व जनावर मालक अजुनही अटकेबाहेर आहेत.
या कारवाहितुन 61 गोवंश जनावरे किमती 7 लक्ष 32 हजार रुपए, दहा चाकी कंटेनर किमती 15 लक्ष रुपये, चार मोबाईल किमती 13 हजार रुपये असा एकूण 22 लक्ष 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त , एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे,पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,एपीआय जीवन भातकुले,डी बी पथक चे संदीप सगणे,संदेश शुक्ला,कमल कनोजिया,सुरेंद्र शेंडे, अनिकेत सांगळे,लवकुश बनोदे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.