महिलांमध्ये नव जयहिंद आणि विदर्भ तर पुरूषांमध्ये काटोल संघांची अंतिम फेरीत धडक

खासदार क्रीडा महोत्सव 2023

खो-खो (विदर्भस्तरीय)

गुरूवार, 12 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

नागपूर :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेमध्ये महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ आणि विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर पुरूष गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळ आणि विदर्भ क्रीडा मंडळ या काटोलच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीतील आव्हान स्वीकारले आहे. अत्यंत चुरशीने उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी संघांना नमवून चारही संघ सायंकाळच्या सत्रात विजेतेपदासाठी झुंज देतील.

महिलांच्या उपांत्य फेरीत नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ (11) संघाचा सामना मराठा फ्रेन्डस अमरावती (10) संघाशी झाला. नव जयहिंद संघाने अवघ्या एक गुणाने सामन्यावर नाव कोरीत अंतिम फेरीत धडक दिली. नव जयहिंद कडून प्रीति धाकर्गे आणि जान्हवी या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करीत संघाला अंतिम फेरीत नेण्यात योगदान दिले. प्रतिस्पर्धी मराठा फ्रेन्ड्स संघाच्या लोखंडे आणि नुबारके या दोन्ही खेळाडूंनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

उपांत्य फेरीच्या दुस-या सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (15) संघाने क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर (13) संघाचा 2 गुणांनी पराभव करीत अंतिम फेरीत जय हिंद संघाचे आव्हान स्वीकारले. विजेत्या विदर्भ संघाकडून चैताली आणि दिव्याने उत्तम कामगिरी करीत अनुक्रमे 6 आणि 1 गुणाचे योगदान संघाच्या विजयात दिले. प्रतिस्पर्धी क्रांती ज्योती संघाच्या अंकिता आणि खुशी या दोन्ही खेळाडूंचे 5 आणि एका गुणाचे योगदान मात्र संघाला अंतिम फेरीपर्यंत नेउ शकले नाही.

उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागलेले मराठा फ्रेन्ड्स अमरावती आणि क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर संघ तिस-या स्थानासाठी झुंज देतील.

पुरूष गटात उपांत्य फेरीत विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (19) संघाचा सामना नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (10) संघाशी झाला. विदर्भ युथ संघाने तब्बल 9 गुणांनी एकतर्फी सामन्यावर नाव कोरीत अंतिम फेरीत धडक दिली. विदर्भ युथ कडून प्रफुल भांगे (4 गुण) आणि फझल खान पठाण (3 गुण) या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करीत संघाला अंतिम फेरीत नेण्यात योगदान दिले. प्रतिस्पर्धी नवमहाराष्ट्र संघाच्या पीयूष नांदूरकर (2) आणि अंकित या दोन्ही खेळाडूंनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

उपांत्य फेरीच्या दुस-या सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (11) संघाने तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (10) संघाचा अवघ्या एका गुणाने पराभव करीत अंतिम फेरीत काटोलच्याच विदर्भ युथ क्रीडा मंडळ संघाचे आव्हान स्वीकारले. विजेत्या विदर्भ क्रीडा मंडळ संघाकडून गायकवाड आणि मेंढे या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत संघाच्या विजयात योगदान दिले.

उपांत्य फेरी निकाल : (सकाळच्या सत्रातील सामने)

महिला

1. नव जय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ (11) विरुद्ध मराठा फ्रेन्ड्स अमरावती (10)

नव जयहिंद क्रीडा मंडळ, यवतमाळ 1 गुणाने विजयी

2. विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल (15) वि. क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर (13)

विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल 2 गुणांनी विजयी

तिस-या स्थानासाठी सामना

मराठा फ्रेन्ड्स अमरावती वि क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर

महिला गटातून अंतिम फेरीत पोहोचलेले संघ

नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल

पुरूष

1. विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (19) वि. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (10)

विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल 9 गुणांनी विजयी

2. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (11) वि. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (10)

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल 1 गुणाने विजयी

तिस-या स्थानासाठी सामना

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर वि. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा

अंतिम फेरीतील सामना

विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी सर्वत्र स्थानिक स्तरावर क्रीडा महोत्सव आवश्यक : शायनी विल्सन

Fri Jan 13 , 2023
खासदार क्रीडा महोत्सव २०२३ नागपूर :- कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचे असते. स्पर्धेतील सहभाग आणि प्रदर्शनातून खेळाडूला प्रोत्साहन मिळते आणि कामगिरी सुधारण्याची संधी देखील मिळते. नागपूर शहरात स्थानिक स्तरावर खासदार क्रीडा महोत्सवासारखे भव्य आयोजन होणे ही क्रीडापटूंसाठी पर्वणी असून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी देशात सर्वत्र स्थानिक स्तरावर अशा महोत्सावांचे आयोजन गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आंतराष्ट्रीय ॲथलिटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com