संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ग्रामीण कार्यकर्ते च्या विनंती वरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या शिफारिशीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनुभवी, तडफदार, पक्षनिष्ठ कूशल संघटक रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांची नागपुर जिल्हा (ग्रामीण) कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती बद्दल शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग, माजी आमदार घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश पदाधिकारी व जिल्हा ग्रामीण नागपुर पदाधिका-यांचे किशोर बेलसरे हयानी सर्वाचे आभार व्यक्त केले.
नागपुर जिल्हा (ग्रामीण) कार्याध्यक्ष पदी किशोर बेलसरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने नागपुर ग्रामिण परिसरात हर्षोउल्लास साजरा करित किशोर बेलसरे यांचे श्याम बाबु पिपलवा, श्रीराम नांदुरकर, मोहम्मद शफी शेख, मधुकर नागपुरे,प्रविण सेलारे, देविदास तडस, नानेश्वर विघे, दिंगाबर ठाकरे, अशोक पाटील, देवराव इंगळे, अभिशेक बेलसरे, गौतम नितनवरे सह कार्यकर्त्यानी अभिनंदन करून ग्रामिण परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.