संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संजय पवार, कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम, रनाळाचे सरपंच पंकज साबळे, रनाळाचे पोलिस पाटील विशाल आमधरे,युवा चेतना मंच चे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले .
या प्रसंगी स्वामी विवेकानंद,राजमाता जिजाऊ,स्व. श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रनाळा ग्रामपंचायत चे सदस्य प्रदीप सपाटे, मयुर गणेर, मंगला ठाकरे, स्वप्नील फुकटे , सुनील चलपे, माजी सभापती उन्मेष रडके , भा.ज.पा कामठी तालुका उपाध्यक्ष अतुल ठाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजकारण बर्वे, जीवन तंरग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के, सचिव घनश्याम चकोले, प्रयत्न जनसंपर्क कार्यालय अध्यक्ष चे कपील गायधने, भा.ज.पा कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, गणपत राव वस्ताद आखाडा चे रविकांत सुपारे ,श्वास जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचे निकेश टेकाडे, शिव नित्य पुजन चे संयोजक अनिल गंडाईत , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे कार्तिक सिरीया, अली ग्रुप चे कामरान जाफरी, जेष्ठ नागरिक संघटनेचे गणेश सपाटे, विद्यार्थी नवयुवक बहुउद्देशीय मंडळ चे सचिन ठाकरे, माजी नगरसेवक प्रतिक पडोळे, भा.ज.पा नागपूर जिल्हा बचत गट प्रकोष्ठचे संयोजक लतेश्वरी काळे , भा.ज.पा युवा मोर्चा भिलगावचे अध्यक्ष खोजेंद्र माकडे, भा.ज.पा नागपूर जिल्हा क्रीडा आघाडी संयोजक राजा देशमुख, विश्वकर्मा आघाडी संयोजक विकास कुंभारे, कलम सांस्कृतिक संस्था चे पंकज वर्मा, बजरंग दल चे राजेश क्षीरसागर,प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी धनश्री लेकुरवाळे यांना”जिजाऊ” पुरस्काराने तर राहुल शेळके यांना” युवारत्न” पुरस्काराने सम्मानित करण्यात आले . याप्रसंगी गणपत वस्ताद आखाडा चे अवनी चिंदमवार व संपूर्ण समुहाचे, अंवती वानखेडे, श्याम मस्के, शौर्य इंगळे यांचे विशेष अभिनंदन पर सत्कार करण्यात आले .
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद (शासकीय मेडिकल कॉलेज) नागपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ३०रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रंसगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता आढाऊ,प्रास्ताविक प्रा.पराग सपाटे, सत्कारमुर्ती चा परीचय अमोल नागपूरे, आभार प्रदर्शन कुणाल सोलंकी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बाँबी महेंद्र , हिमांशू लोंढेकर, प्रफुल्ल बावनकुळे, प्रफुल्ल सिंगाडे, कमलाकर नवले, मयुर गुरव , सुयोग सपाटे, दिपांशु सपाटे, गौतम पाटील, निखिल पाटील, नितीन ठाकरे, नरेश सोरते, जगदीश वानोडे ,रुपेश चकोले , प्रिया निमकर, दिपांशु बोरकर आदी चेतना मंच चे सदस्य तसेच नेहरू युवा केन्द्र आदीनी सहकार्य केले.