युवा चेतना मंचतर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून युवा चेतना मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे , राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता शिर्के , विशेष अतिथी महाराष्ट्र टाईम्स चे वरिष्ठ पत्रकार वैभव गांजापुरे तर प्रमुख पाहुणे कामठी पंचायत समीतिच्या सभापती दिशा चनकापुरे , रनाळाचे सरपंच पंकज साबळे , नेहरू युवा केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर सिंग, जिल्हा परीषद विरोधी पक्षनेते अनिल निधान , माजी पंचायत समीती सभापती उन्मेष रडके , जीवनतंरग संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.

याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच अंकिता तळेकर , गादाचे सरपंच सचिन डांगे , रनाळा ग्रामपंचायतचे सदस्य.अर्चना ठाकरे, मंगला ठाकरे , सुनील चलपे , मयूर गणेर , इंदुताई पाटील ,स्वप्निल फुकटे , सुनिता नंदेश्वर , स्मिता भोयर , अरविंद डोंगरे , आमिर खान , प्रदीप सपाटे, रश्मिता झाडे यांचा सत्कार करण्यात आले . याप्रसंगी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ,स्व. श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी रनाळा गावातील सेवानिवृत्त सौनिक शेषराव अढाऊ , महेश ईंगोले ,सिध्दार्थ गणेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पँरा एँथलेटिक्स शुभम सिंगनाथ यांना “युवारत्न ” पुरस्काराने तर आंचल बोंबाटे यांना “जिजाऊ” पुरस्काराने तर आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स माजी सौनिक अक्रम खान विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले . याप्रसंगी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ३०रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रंसगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे , प्रास्ताविक प्रा.पराग सपाटे , सत्कारमुर्ती चा परीचय प्रिती हिवरेकर , आभार प्रदर्शन नम्रता अढाऊ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बाँबी महेंद्र , अमोल नागपुरे , मयूर गुरव , अभिलाष नितनवरे, कमलाकर नवले , अनिल गंडाईत , लक्ष्मीकांत अमृतकर ,हितेश बावनकुळे , कामरान हैदरी ,आशिष हिवरेकर , नितीन ठाकरे ,उमेश गिरी , घनश्याम चकोले ,सत्यम यादव , लोकेश यादव , अक्षय गिरी , भुषण ढोमणे, अतुल चोरघडे , रूपेश चकोले, अश्विन ठाकरे, राजेश मौर्या, हिमांशु लोंडेकर , डॉ निखील अग्निहोत्री , गौतम पाटील निखिल पाटील, संगीता आढाऊ , भावना सपाटे ,युवा चेतना मंच चे सदस्य तसेच नेहरू युवा केन्द्र आदीनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुद्धिबळ स्पर्धेत दिशांक बजाजला विजेतेपद

Thu Jan 12 , 2023
खासदार क्रीडा महोत्सव 2023 बुद्धिबळ बुधवार, 11 जानेवारी 2023https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कविवर्य सुरेश भट सभागृहhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत चौथा मानांकित दिशांत बजाजने विजेतेपद पटकाविले. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या अंतिम फेरीत दिशांक बजाजने संस्कार गायगोरेला, सिद्धांत गवईनने शिवा अय्यरला, वृतिका गेमने हिमांशू जेठवाणीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com