तरोडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 ला नेहरू युवा केंद्र नागपुर,(युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय,भारत सरकार)यांच्या माध्यमातून कामठी तालुक्यातील प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी येथे हॉकी चे महान जादूगर मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंती निम्मित राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्त दौड आणि कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांचे फोटोंचे पूजन करून करण्यात आली.विजेता टीम ला गोल्ड मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता टीम ला सिल्व्हर मेडल देऊन गौरविण्यात आले.तसेच दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक निशा वाघ यांनी पटकाविला.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवा स्वयंसेविका दीप्ती महल्ले यांनी केले तर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित म्हणून शाळेच्या प्राचार्य नंदा ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रमेश लेकुरवाळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत महल्ले आणि सौरभ बोरकर यांनी मेहनत घेतली,कार्यक्रमाचे संचालन यामिनी यांनी केले तर आभार राजू बरगटे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"त्या' अनाथ चिमुकल्यांची राखीपौर्णिमा उत्साहात

Tue Aug 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – स्वामी अवधेशानंद शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत उपक्रम कामठी :- भाऊ-बहिणीच्यानात्याला आणखी घट्ट करणारा राखीपौर्णिमा हा सण. या सणाच्या दिवशी प्रत्येक घरातच धामधूम पाहायला मिळते. मात्र, दुर्दैवाने ज्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आलेली आहे, त्या चिमुकल्यांनी हा सण कसा साजरा करावा? काही अनाथ मुलांना तर रक्षाबंधन म्हणजे काय असते हे देखील माहीत नसते. अशावेळी आपले दायित्व म्हणून कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com