संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– एकुण ५६३१ लाभार्थीनी घेतला लाभ
कन्हान :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम थाटात संपन्न झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे यांनी सर्व जनतेला आपल्या ० से ५ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना लस पाजुन घेण्याविषयी आवाहन केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान अंतर्गत एकुण ५४ बूथ लावुन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहि म राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
डॉ विनोद बिटपल्लीवार साथरोग अधिकारी जि प नागपुर, नितीन मून आरोग्य पर्यवेक्षक जि प नागपुर यांनी आकस्मिक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सर्व माहितीचा आढावा घेतला. कार्यक्षेत्रात एकूण ५८३४ पैकीं ५६३१ लाभार्थीना लस देण्यांत आली. मोहिम यशस्वि करण्यासाठी डॉ. वैशाली हिंगे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, डॉ तेजस्विनी गोतमारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, हंसराज ढोके, सज्जनदास धूल, सुनिल गायक वाड,
आरोग्य सहाय्यक, माया हरडे आरोग्य सहायिका, अथर्व बंड, विलास सहारे, यशवंत घोटेकर, हरीदा स, पराते गौतम, झोडापे आरोग्य सेवक, महेंद्र सांगोडे, गौरव भोयर, चंचल, यामिनी, जामणिक, नाईक, हटवार, आशुतोष नखाते व स्थानिक स्तरावरील सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.