बहुजनांसाठी राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचा विशेष प्रयत्न
मुंबई :- देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) नेतृत्वात वंचित, शोषित, पीडित आणि उपेक्षितांना राजकीय विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पॉलिटब्युरो तयार केला जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील नेत्यांना एकत्रित करून ही राजकीय चळवळ उभारण्यात येईल, असे इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) आणि राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पातळीवरील या पॉलिटब्युरोमध्ये अध्यक्ष ही संकल्पना राहणार नाही.सर्व ओबीसी संघटना एकाच विचारपीठावर आल्यावर अल्पसंख्यांक आणि बहुजन समाज पार्टीसह इतर संघटना एकत्रित येतील. विशेष म्हणजे या पॉलिटब्युरोत भांडवलशाही तसेच संघाच्या विचाराने प्रेरित प्रादेशिक पक्षांना स्थान दिले जाणार नाही. संघटनात्मक रचनेत चंचुप्रवेश करुन ही मंडळी वाळवीप्रमाणे संघटनेला उद्वस्थ करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येणार नाही,असे पाटील म्हणाले.
केंद्रात १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता सरकारमध्ये ओबीसींचे मोठे प्रस्थ होते.पंरतु, समन्वय अभावी राजकीय संधी त्यांनी गमावली.या सरकारमध्ये अगोदर कालेलकर आयोग लागू करीत नंतर त्यात संशोधन करून बदल केला जावू शकत होते. मात्र, संघ-जनसंघ आणि भांडवलदार विचारसणीने डाव साधत मंडल आयोग नेमला. हा आयोग लागू करण्याअगोदर जनसंघाचे सरकार पडले.यावेळी सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांना समन्वय साधत जनता पक्ष ताब्यात घेतला असता तर जनसंघाचे सरकार बरखास्त झाले नसते आणि भारतीय जनता पक्ष स्थापन झाला नसता. मात्र हाच डाव साधत संघप्रणीत भांडवलवादी आणि जनसंघाने राजकीय व्युहरचना आखत भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.
सर्व पक्षीय ओबीसी नेते त्यामुळे सैरभैर झाले.१९८७ ते ९० च्या काळात परत जनतादलाचे माध्यमातून समाजवादाच्या नावाखाली ओबीसींना परत संघी विचाराचे समाजवाद्यांनी ओबीसींना भूरळ घातल्याने ते भाजप,समाजवादी आणि कॉंग्रेसमधून बाहेर पडले व कांशीराम यांचे मंथनातून जनता दल तयार करून सत्ता मिळवली.परत त्यात चुका करीत ओबीसी अर्धवट वाटा घेवून समाधानी राहील.गेल्या ३० वर्ष झाली ते सर्व ओबीसी नेते आज प्रादेशिक राज्यात सत्ता उपभोगत सत्ताधीश झाले आणि ओबीसी पोरकी जनता पोरकी झाले.दुसर्या पिढीतील ओबीसी नेते महत्वाकांक्षी आहे.अशात ही ऐतिहासिक संधी ओबीसी बांधवांनी सोडून नये असे आवाहन पाटील यांनी केला.