कन्हान :- साईनाथ विद्यालय बोरडा (गणेशी) या ग्रामिण शाळेत शिक्षण घेत असलेले वेदांत रच्छोरे व शौर्य कुथे हे विद्यार्थी आर्चरीचे राष्ट्रीय व राज्य स्तरिय शालेय क्रिडा स्पर्धेत स्वत: चे आणि शाळेचे नाव लौकिक करित आहे.
ग्रामिण भागातील साईनाथ विद्यालय बोरडा (गणेशी) ता. पारशिवनी जि. नागपुर येथिल शिक्षण घेत असलेले दोन विद्यार्थी १) वेदांत विनोद रच्छोरे इयत्ता ९ वी व २) शौर्य सुधाकर कुथे इयत्ता ८ वी हे धनुविद्या या शालेय क्रिडा स्पर्धेत शाळेचे नाव राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकवित आहे. वेदांत रच्छोरे याने मागील वर्षी गुजरात च्या नाडिपाल मध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धेत तिसरा क्रंमाकाचे रौप्य पदक पटकाविले होते.
तसेच तो २००९-१० पासुन अनेक राज्य स्तरिय शालेय स्पर्धेत पदके पटकावित आहे. आणि शौर्य कुथे हा सुध्दा अनेक शालेय स्पर्धेत राज्य स्तरावर पोहचुन शाळेचे नाव लैकिक करित आहे. वेदांत रच्छोरे हा त्यांच्याच शाळेच्या मुख्यध्याप कांचा मुलगा असुन मुख्याध्यापक विनोद रच्छोरे हे सुध्दा पँरा आर्चरीचे नँशनल खेडाळु आहे. व या खेडा ळुना प्रशिक्षित करित आहे. त्यांच्या मते या ग्रामिण विद्यार्थी खेडाळुना शासना तर्फे चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या तर हे विद्यार्थी नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेडाळु बनु शकतील. म्हणुनच शासनाला विनंती आहे की, शासनाने अश्या ग्रामिण भागातील शाळेकडे लक्ष देऊन शाळेला मदत करून ग्रामिण विद्यार्थी खेडाळुना सहकार्य करावे.