नरखेड :- दिनांक २७/०७/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नरखेड येथील पोलीस स्टाफ पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, नरखेड ते खंडाळी रोड येथून जनावर वाहतुक करणारा एक इसम हा आपल्या वाहनामध्ये अवैधरीत्या जनावरांची वाहतुक करीत आहे. अशा माहिती वरून नरखेड ते खंडाळी रोड येथे नाकाबंदी लावली असता पिकअप वाहन क्र. एम. एच. ४० / सी. एम. २९९६ चा चालक आरोपी नामे जगदिश मनोहर तुमडाम, वय ३२ वर्ष केदारपुर त. काटोल त्याचे ताब्यातील पिकअप वाहनामध्ये ०८ गोरे गोवंश (जनावरे) अवैधरित्या कोंबुन दोरीच्या साहयाने त्यांचे पाय व शिंगे बांधुन घेवुन जात असतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन ०८ गोरे गोवंश (जनावरे) किमती अंदाजे ८५,०००/- रू व पिकअप वाहन क्र. एम. एच. ४० / सी. एम. २९९६ किंमती अंदाजे ४,००,०००/- रु असा एकुण ४,८५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सरकार तर्फे पोशि अक्षय ठाकरे, पोस्टे नरखेड यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुद्ध कलम ११. (१) (डी) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधिनियम १९६० सहकलम ५ (ए). ५ (वि) ९ पशु संरक्षण अधिनियम, सहकलम ११९ म.पो. का कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक गजानन तितरे हे करीत आहे.
नरखेड पोलीसांनी अवैध गोवंश वाहतुक करणारा पिकअप वाहन पकडून ०८ गोवंश यांना दिले जिवनदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com