– कन्हान पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल
– कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव (येसंबा) गावातील घटना
कन्हान :- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव (येसंबा) च्या सरपंचाला सार्वजनिक ठिकानी जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिली. असून आरोपी प्रशांत जगन ठाकरे रा. नांदगांव (येसंबा) यांचेवर ॲट्रासिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती नुसार फिर्यादी नांदगाव (येसंबा) सरपंच मिलिंद गेंदलाल देशभ्रतार वय 28 वर्ष रा.नांदगाव (येसंबा) हा शनिवार दि.5 फेब्रुवारीला सोमवारी रात्री 9.15 वाजता दरम्यान हा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ गावातील मित्रान सोबत बोलत होता .त्यावेळी प्रशांत जगन ठाकरे हा तिथे आला व फिर्यादी च्या दुचाकी वाहनाची चाबी काढत होता तेंव्हा फिर्यादीनी त्याला मनाई केली. तेंव्हा प्रशांत ठाकरे यांनी फिर्यादी सरपंच यांची कॉलर पकड़त जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. व या गावातील राहणाऱ्या सर्व अनुसूचित जातीचे लोकांना ही जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फ्रियादी ने तक्रार दिली. याप्रकरणी 8 फेब्रुवारीला रात्री 8.30 वाजता आरोपी प्रशांत जगन ठाकरे (30.वर्ष) रा. नांदगांव (येसंबा) विरुद्ध कन्हान पोलीसांनी भादवी कलम 504,506 सह अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गावातील ॲट्रासिटी दूसरे प्रकरण
4 महिन्या अगोदर 19 ऑक्टोंबरला याचं नांदगाव (येसंबा) गावातील घटना पोलिस पाटीला सह आठ जणावर ॲट्रासिटी ॲक्ट चे गून्हा दाखल करण्यात आले होते.आणि त्याच्या मागोमाग पुन्हा ॲट्रासिटी चे दुसरे प्रकरण दाखल झाले तरी याकडे पोलीस प्रशसनाने गांभीर्यने दखल घेणे गरजेचे आहे. वारंवार ॲट्रासिटीचे गुन्हे प्रकरणामुळे नांदगाव (येसंबा) हे गाव अती संवेनशील होत आहे. कोणतीही जातीय तेढ़ निर्माण होवू नये.