रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकरांची आघाडी

नागपूर :- घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेला नागपुरकर ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण 1 लाख 40 हजार 808 सोलर रुफ़ टॉप पैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात 24 हजार 357 ग्राहकांनी तर वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवून पर्यावरणपुरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत सुरू केली आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल दोन हजार 53 मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील 24 हजार 357 रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता 251 मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉपच्या तुलनेत 17.29 टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे. नागपुर परिमंडलाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 रुफ टॉप ग्राहकांसह परिमंडलातील एकूण 27 हजार 10 ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली असून राज्यातिल एकूण सोलर रुफ़ टॉप मध्ये नागपूर परिमंडलाचा वाटा 19.18 टक्के आहे.

आकडे बोलतात

सात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ 1 हजार 74 ग्राहकांकडून 20 मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी झाली आहे, मागिल वर्षी ही संख्या 76 हजार 808 इतकी होती. यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता एक हजार 860 मेगावॉट होती, एकट्या नागपूर जिल्ह्यात मागिल आर्थिक वर्षात तब्बल 10 हजार 94 ग्राहकांनी 82 मेगावॅट स्थापित वीज निर्मिती करणा-या रुफ़ टॉफ संचाची स्थापना केली आहे.

सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाचा नेहमीपेक्षा कमी वीज वापर होतो, त्यामुळे वीजबिलात देखील कपात होते. याशिवाय ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देया येते, अशी ही योजना आहे.या योजनेत नोंदणी करण्यासाठी  https://pmsuryaghar.gov.in/discom/solar/account/subDivisionListया संकेतस्थळावर किंवा पीएम – सूर्यघर मोबाईल ॲपवर नोंदणी केल्यानंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या संकेतस्थळावर जाऊन संपुर्ण प्रकिया पुर्ण करायची आहे. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.

सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ़ टॉप सोलर योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एकनाथांच्या परीक्षेचा काळ आणि सभोवतलचे खट्याळ 

Fri May 3 , 2024
आजची हि आणीबाणीची वेळ कोणी कोणावर आणली त्यावर नेमके उत्तर तेही लोकसभा निवडणूक निकाल लागण्यापूर्वी सांगणे कठीण आहे पण गढूळ राजकीय जे वातावरण या राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे ज्या पद्धतीने शिवसेना आधी दुभंगली त्यानंतर खंगली आहे त्यात नेमकी चूक एकनाथांच्या नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या हुकूमशहा आणि हिशोबी वृत्तीतून ओढवलेली आहे हे नक्की. बाहेर पडलेल्या एकनाथांची आजची शिवसेना कि उद्धव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com